Latest:

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

Latest:

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

रावेरसामाजिकसावदा

सावदा शहरात डासांचा प्रादुर्भाव वाढला; तातडीने किटकनाशक फवारणीची शिवसेनेची मागणी

सावदा.ता. रावेर. मंडे टु मंडे न्युज | सावदा शहरात डासांसह इतर किटकांचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव वाढला असून, अस्वच्छतेमुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. मलेरिया, टायफाईड यांसारख्या आजारांचा धोका वाढत असल्याने नगरपरिषदेने शहरात तातडीने किटकनाशक फवारणी करावी, अशी मागणी शिवसेनेच्या वतीने करण्यात आली आहे.

शिवसेना सावदा शहर शाखा (ठाकरे गट) कडून याबाबत सावदा नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांना २ सप्टेंबर २०२६ रोजी निवेदन देण्यात आले.शहरातील विविध भागांमध्ये डास व इतर किटकांचा सुळसुळाट झाल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे रोगराई पसरण्याची शक्यता असून नागरिकांच्या आरोग्यावर त्याचा परिणाम होऊ शकतो, अशी चिंता व्यक्त करण्यात आली आहे.

शहरातील नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने हातपंपाद्वारे किटकनाशक फवारणीची मोहीम लवकरात लवकर राबवावी, अशी मागणी शिवसेनेने केली आहे. फवारणी केल्यास डास व किटकांचा बंदोबस्त होऊन रोगराई पसरण्यास प्रतिबंध होईल, असेही निवेदनात म्हटले आहे.

दरम्यान, या मागणीची तातडीने दखल न घेतल्यास शिवसेनेच्या वतीने आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे. या वेळी शहर प्रमुख भारत नेहेते, शरद गिरधर भारंबे, डिगंबर रामू महाजन, सुनील एकनाथ राणे, धनंजय वासुदेव चौधरी, मिलिंद सुरेश पाटील आदी उपस्थित होते.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!