भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईममुक्ताईनगर

मुक्ताईनगर परिसरात अवैध उत्खनन : गौण खनिज तस्करांपुढे प्रशासन हतबल ! प्रशासनाचे झोपेचे सोंग ?

मंडे टू मंडे वृत्तसंकलंन।

मुक्ताईनगर, प्रतिनिधी : तालुका प्रशासनाच्या नाकावर टिचून तालुक्यात अवैध गौण खनिजाची चोरी केली जात असल्याची माहिती समोर येत असून बोदवड रोडला असलेल्या शेतमालकानेच मुक्ताईनगर तहसीलदार यांचे कडे लेखी तक्रार दाखल केलेली आहे.

याबाबत सविस्तर असे, नेसर्गिक गौण खनिज उपसा व पर्यावरणाला हानिकारक प्रकार संदर्भात शासनाचे कठोर धोरण आहे, असे असतानाही मुक्ताईनगर तालुक्यात मुरुमाच्या अवैध उत्खनन केले जात आहे बोदवड रोडला लागून शेत गट नंबर ६११ मधून उत्तरे कडुन व त्या शेजारी शासनाची जमीन गट नंबर ६१० या दोघी गटात रात्री मुरुमाचे अवैध उत्खनन होत असल्याचे समोर आणत शेतमालक हकीम आर चौधरी यांनी मुक्ताईनगर तहसीलदार यांचे कडे लेखी तक्रार दाखल केलेली आहे, तालुका मोठ्या प्रमाणात गौण खनिजाची चोरी होत आहे. या पाठोपाठ आता मुरुमाचे ही अवैध उत्खनन केले जात आहे, जेसीबीने रात्री खुदाई केली जात असून राजरोसपणे हा प्रकार सुरू असताना महसूल विभागाचे अधिकारी मात्र यावर कोणतीही कारवाई करताना दिसत नाही, यामुळे शासनाला भुर्दंड सोसावा लागत असून शासनाची भरारी पथके नावालाच आहे का असा प्रश्न नागरिक उपस्थित करत आहे. गौण खनिज तस्करांपुढे प्रशासन हतबल झाल्याचे दिसत असून गावात बिना नंबर चे जे सी बी व ट्रॅक्टर फिरत आहे, आरटीओ याच्यावर कार्यवाही करतील का? अवैधरित्या होणाऱ्या गौण खनिजाच्या उत्खननामुळे सरकारी महसूल मोठ्या प्रमाणावर बुडत आहे. शिवाय वाळूचाही बेकायदा उपास केला जात असल्याने यामुळे पर्यावरणाची हानीही होत आहे. याबाबत प्रशासन मात्र आरोपींना पकडण्यासाठी तितकासा रस दाखवत नसल्याचे समजते. प्रशासन आणि पोलिस मिळून संयुक्तरित्या गौण खनिज तस्करांवर कारवाईचा बडगा उगारतील का ?

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!