महिला तहसीलदारांच्या घरात सापडले ६० तोळे सोने,एसीबी ची कारवाई
नवी मुंबई,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। लाच लुचपत पथकाने अलिबाग येथील महिला तहसीदार मीनल दळवी यांच्या घराच्या तपासणीत ६० तोळे सोने आणि २८ हजार रोकड सापडल्याने खळबळ उडाली आहे,मीनल दळवी यांची दीड वर्षभरापूर्वी अलिबाग तहसीलदार म्हणून नियुक्ती झाली होती दरम्यान दळवी यांना लाच घेतल्याप्रकरणी नवी मुंबई लाच लुचपत पथकाने अटक केल्यानंतर त्याच्या अलिबाग येथील निवास्थानी तपासणी केली असता ६० तोळे सोन्यासह २८ हजार रोकड मिळाली असून अजून मोठे घबाड मिळण्याची शक्यता आहे.
गेल्या महिन्याभरापासून लाच लुचपत पथक हे तहसीलदार दळवी याच्या मागावर होते. अखेर ११ नोव्हेंबर रोजी सापळा रचून नवी मुंबई पथकाने फिर्यादी यांच्याकडून दोन लाख घेताना राकेश चव्हाण याला अटक केली. तर दळवी यांच्यासाठी पैसे घेतल्याचे चव्हाण याने सगितल्याने त्यांनाही अटक करण्यात आली.
सासऱ्याना मिळालेल्या बक्षीस पात्र जमिनीवर नाव चढविण्यासाठी आणि सासऱ्याच्या भावाने बक्षीस पत्रावर घेतलेल्या हरकतीचा अपील प्रकरणात निकाल सासऱ्याच्या बाजूंना द्यावा यासाठी तहसीलदार मीनल दळवी यांनी तीन लाखाची लाच मागितली होती. याबाबत फिर्यादी यांनी २८ सप्टेंबर रोजी नवी मुंबई लाच लुचपत विभागाकडे तक्रार केली होती. २९ सप्टेंबर रोजी पथकाने याबाबत सत्यता पडताळून रकमेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले होते, लाच घेतल्या प्रकरणी अटकेत असलेल्या तहसीलदार मीनल दळवी आणि एजंट राकेश चव्हाण यांना शनिवारी न्यायलायात हजर केले असता न्यायालयाने दोघानाही सोमवारपर्यंत दोन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.