अमळनेरक्राईम

अल्पवयीन मुलीवर तोंड दाबून अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न

अमळनेर, मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। १६ वर्षीय अल्पवयीन मुलगी आपल्या घरात झोपली असतांना तिचे तोंड दाबून तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न झाल्याची धक्कादायक घटना अमळनेर तालुक्यात घडली.

पिडीत मुलीच्या आजीने दिलेल्या फिर्यादी नुसार १६ वर्षीय अल्पवयीन मुलगी घरात झोपली असतांना भुषण साहेबराव पाटील हा तिचे तोंड दाबून मारहाण करत तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न करत होता. आपल्या नातीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न होत असल्याचे बघून आजीने त्याला प्रतिकार केला असता अल्पवयीन मुलीच्या आई व आजीला मारहाण करुन तो पळून गेला. काही वेळाने भुषण व त्याचे वडील साहेबराव असे दोघे तेथे आले. त्या दोघांनी मिळून जातीवाचक गलिच्छ शिवीगाळ करत मारहाण केली,या प्रकरणी भूषण साहेबराव पाटील व साहेबराव हरचंद पाटील या दोन्ही पिता पुत्रां विरुद्ध अमळनेर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!