भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

महाराष्ट्रशैक्षणिक

शिक्षण विभागाचा घुमजाव, अभ्यासक्रम पूर्ण झालेल्या शाळांना सुट्टी

मंडे टू मंडे वृत्तसंकलन।

मुंबई,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। विधर्थ्यांना या वर्षी उन्हाळी सुट्या नाही या शिक्षण विभागाच्या वक्तव्यावर पालकांनी संताप व्यक्त केल्या नंतर ,विद्यार्थ्यांच्या उन्हाळी सुट्टीवर कोणत्याही प्रकारची गदा येणार नसून, ज्या शाळांचा अभ्यासक्रम पूर्ण झाला नसेल, त्याच शाळा एप्रिल अखेरपर्यंत सुरू ठेवण्यात येणार आहेत. ज्या शाळांमधील अभ्यासक्रम व परीक्षा पूर्ण झाल्या असतील त्या विनाकारण सुरू ठेवण्याचे काहीही कारण नसल्याचे शिक्षण आयुक्त सूरज मांंढरे यांनी सांगितले. एप्रिलअखेरपर्यंत शाळा सुरू ठेवण्याच्या सूचना शिक्षण विभागाने दिल्या होत्या. त्यामुळे शाळा प्रशासन, शिक्षक व पालकांकडून संताप व्यक्त करण्यात येत होता.

पहिली ते नववी आणि अकरावीच्या परीक्षा एप्रिल अखेरपर्यंत सुरू ठेवण्याच्या आणि एप्रिलच्या तिसर्‍या आठवड्यामध्ये परीक्षा घेण्याच्या सूचना शालेय शिक्षण विभागाने परिपत्रकाद्वारे सर्व शाळांना दिल्या होत्या. मात्र अनेक शाळांमध्ये सध्या नववीची परीक्षा सुरू असून, शाळांकडून अन्य वर्गांच्या परीक्षांचे नियोजन करून प्रश्नपत्रिकाही तयार केल्या आहेत. तसेच अनेक पालकांनी गावाला जाण्याचे तिकिटाचे आरक्षण केले आहे. त्यामुळे शालेय शिक्षण विभागाच्या या निर्णयाविरोधात शाळा प्रशासन, शिक्षक व पालकांकडून संताप व्यक्त करण्यात येत होता.

मात्र यावर आता शिक्षण आयुक्तांनीच स्पष्टीकरण दिले आहे. कोरोना काळात काही कारणास्तव अभ्यासक्रम पूर्ण करू न शकलेल्या शाळांसाठी हे निर्देश दिले आहेत. तसेच मे महिन्यांमध्ये शाळा सुरू ठेवाव्यात, असे या परिपत्रकामध्ये कोठेही म्हटलेले नाही. त्यामुळे मुलांच्या उन्हाळी सुट्ट्यांवर कोणताही परिणाम होणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!