भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

महाराष्ट्रशैक्षणिक

एप्रिल महिना आणि विद्यार्थ्यांसाठी सुट्ट्यांची मेजवानी,किती सुट्ट्या आहेत विद्यार्थ्यांना एप्रिल मध्ये

मुंबई, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l नुकत्याच काही दिवसांपूर्वी दहावी, बारावीच्या परीक्षा संपल्या असून आता इतर मुलांच्या परीक्षांना सुरुवात झाली आहे. मात्र त्याआधीच विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. सुट्टी हा विषय विद्यार्थ्यांच्या आवडीचा असतो आणि शाळेतील मुले मोठ्या सुट्टयांची वाट पाहत असतात. शैक्षणिक दिनदर्शिकेनुसार सुट्ट्या ठरतात आणि संपूर्ण वर्षात विविध सणांना विद्यार्थ्यांना किती सुट्ट्या मिळणार यासंदर्भात माहिती दिली जाते. मार्चमध्ये विद्यार्थ्यांना विविध सणांमुळे सुट्ट्या मिळाल्यानंतर आता पुन्हा एकदा विद्यार्थ्यांना जवळपास १० ते ११ दिवस सुट्ट्या मिळणार असल्याची माहिती समोर येत आहे.

लोकसभा निवडणुका जाहीर झाल्या असून त्या ७ टप्प्यात होत आहेत. त्यातील १९ एप्रिल आणि २६ एप्रिल या दोन तारखांना लोकसभा निवडणुकीतील २ टप्पे होणार आहेत. राज्यांमध्ये लोकसभा निवडणुकीमुळे शाळेत सुट्ट्या जाहीर करण्यात आल्या आहेत. याशिवाय शाळेतील शिक्षण मतदानाच्या कामत व्यस्त असल्याने विद्यार्थ्यांना सुट्टी मिळण्याची शक्यता आहे. तसेच गुढीपाडवा आणि ईद शिवाय विद्यार्थ्यांना अनेक सुट्ट्या मिळणार आहेत.

उद्यापासून एप्रिल महिन्याला सुरुवात होणार असून ७ एप्रिस, १४ एप्रिल, २१ एप्रिल आणि २८ एप्रिलला रविवार असल्याने विद्यार्थ्यांना आठवड्याची सुट्टी मिळणार आहे. याशिवाय ९ एप्रिलला गुढीपाडवा, ११ एप्रिलला ईद निमित्त शाळा बंद असतील. १३ एप्रिलला बैसाखी सणामुळे पंजाब-हरियाणातील अनेक क्षेत्रांमध्ये शाळा बंद असतील. १४ एप्रिलला आंबेडकर जयंतीनिमित्त शाळांना सुट्टी असते. मात्र या दिवशी रविवार आल्याने विद्यार्थ्यांची ही सुट्टी वाया जाणार आहे. यानंतर १७ एप्रिलला विद्यार्थ्यांना राम नवमीची सुट्टी मिळेल आणि त्यानंतर २१ एप्रिलला महावीर जयंतीनिमित्त विद्यार्थ्यांना सुट्टी मिळणार आहे. याचा अर्थ एप्रिलच्या ३० दिवसांच्या महिन्यात विद्यार्थ्यांना १० ते ११ दिवस सुट्टी मिळणार आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!