राशीभविष्य : आज शुक्रवार १५ सप्टेंबर २०२३. प्रकृतीची काळजी घ्या, चंद्राचे आज कन्या राशीत भ्रमण. कसा असेल आपला आजचा दिवस
मंडे टू मंडे न्यूज वृत्तसेवा। आज शुक्रवार १५ सप्टेंबर २०२३, ज्योतिषशास्त्रात जन्मकुंडलींद्वारे वेगवेगळ्या कालखंडांबद्दल भाकिते केली जातात. दैनंदिन राशिभविष्य रोजच्या घडामोडींचे अंदाज देते, तर साप्ताहिक, मासिक आणि वार्षिक राशिभविष्य अनुक्रमे आठवडा, महिना आणि वर्षाचा अंदाज असतो. दैनिक राशिफल हे ग्रह-नक्षत्राच्या हालचालीवर आधारित एक भविष्यवाणी आहे, ज्यामध्ये सर्व राशींचे (मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ आणि मीन) तपशीलवार वर्णन केले आहे. ही कुंडली काढताना ग्रह-नक्षत्रांसह पंचांगाच्या समीकरणाचे विश्लेषण केले जाते. दैनंदिन राशीभविष्य तुम्हाला नोकरी, व्यवसाय, व्यवहार, कुटुंबआणि मित्रांसोबतचे संबंध, आरोग्य आणि दिवसभरातील शुभ-अशुभ घटनांचे भाकीत देते.
मेष
आज षष्ठस्थानात चंद्र मंगळाच्या सह आहे. बंधुभेट होईल. कुटुंब आनंदी राहील. सार्वजनिक कार्यात भाग घ्याल. तसेच राशीस्थानातील गुरू प्रतिष्ठा वाढवेल. जीवनात रस निर्माण करेल. दिवस मध्यम .
वृषभ
घरात महत्वाचे निर्णय घ्याल . पंचम स्थानातील चंद्र मित्र भेट घडवेल. व्यय राहू गुरू न्याय बंधन पाळा असे सांगत आहेत. घरामध्ये जबाबदारी येईल. प्रकृतीची काळजी घ्या. आर्थिक दृष्ट्या दिवस बरा .
मिथुन
आज चंद्र आर्थिक आणि व्यवसायसंबंधी क्षेत्रात यश देईल . सामाजिक दृष्ट्या चांगला दिवस आहे. लाभ स्थानात गुरू आहे. कार्याला शुभ संकेत देत आहे. वैवाहिक जीवन आनंदात जाईल. दिवस उत्तम.
कर्क
चंद्र भ्रमण तृतीय स्थानातून होत आहे. . चंद्रमंगळ योग नैराश्य कमी करेल. घरामध्ये पाहुणे येतील. आर्थिक दृष्टया बरा दिवस .जास्त काळ कार्यात घालवाल. प्रकृतीला जपा.. रवि गुरू सामाजिक लाभ देईल..दिवस उत्तम.
सिंह
आज राशी स्वामी रवि स्वस्थानात आहे. अधिकारी व्यक्तींशी संबंध येईल. चंद्र सामाजिक क्षेत्रात आणि आर्थिक दृष्ट्या विशेष घटना घडवेल. लाभ होतील. धार्मिक स्थळांना भेट असा योग आणेल. दिवस मध्यम.
कन्या
राशी स्थानातील मंगळ व चंद्र व्यावसायिक आणि आर्थिक दृष्ट्या अचानक फळ देईल. खर्च वाढ करेल.. वैवाहिक जीवन बरे राहील. जोडीने घरासाठी खरेदी कराल . अष्टमातील ग्रह प्रकृती जपा असे सांगत आहे. दिवस बरा.
तुला
व्ययस्थानात मंगळ आर्थिक ,नोकरी संबंधी अडचणी आणेल . कुटुंबाचे सुख मिळेल. सामाजिक घटना घडतील. व्यय चंद्र, राशीतील केतू थोडा मानसिक ताण निर्माण करेल. शनी संतती कडे लक्ष द्या असे सांगत आहे. दिवस उत्तम.
वृश्चिक
चंद्र व्यावसायिक , मानसिक, आर्थिक लाभ करील. रवि संतती आणि शिक्षण यासाठी उत्तम आहे. प्रवास जपून करा .भवताल परिस्थितीचे भान ठेवा. घरामध्ये जास्ती काम पडेल. नोकरीमध्ये संधी, वैवाहिक दृष्ट्या दिवस मध्यम.
धनू
आर्थिक बाजू समाधानी असेल तर मन आनंदी राहील. शुक्र मंगळ भ्रमण खर्चिक अनुभव देईल. जोडीदार आणि मित्र मंडळी सोबत मजेत दिवस जाईल. संततीची काळजी घ्या. दिवस शुभ.
मकर
रवि धर्म आणि संस्कृती बद्दल आस्था देईल. जोडीदाराला यश देईल . पोटाची काळजी घ्या. मातृपितृ चिंता निर्माण होईल. तसेच वरिष्ठांशी मतभेद संभवतात. चंद्र जीवनाची दिशा निश्चित करेल. प्रवास संभवतात. दिवस कामकाज करण्यात घालवाल.
कुंभ
अष्टम स्थानातील चंद्रमंगळ कुटुंबविषयी समाचार देईल. सरकार दरबारी असलेली कामे होतील. राशी स्थानातील शनी मानसिक विरक्त वृत्तीचा अनुभव देईल. ईश कृपेने दिवस बरा जाईल .
मीन
मंगळ जोडीदाराच्या प्रकृतीची काळजी घ्या असे सांगत आहे. सरकारी कामे, वरिष्ठ भेट होईल. अष्टम केतू कमरेचे त्रास निर्माण करील. चंद्र सामाजिक,कौटुंबिक जीवनात लाभ देईल. गृहसौख्य मिळेल. आर्थिकदृष्ट्या दिवस शुभ.
शुभम भवतू !!