भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

आरोग्यमहाराष्ट्रसामाजिक

होळी व धुलीवंदनाच्या पश्वभूमीवर राज्य सरकार कडून नवीन नियमावली जारी

मंडे टू मंडे वृत्तसंकलन।

मुंबई,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। राज्यात दरवर्षी होळी आणि धुलिवंदनाचा उत्साह दरवर्षी पाहायला मिळत असतो. परंतू गेली दोन वर्षे कोरोनाच्या संसर्गामुळे हा उत्सव साजरा करण्यावर सरकारने प्रतिबंध घातले होते. मात्र यंदा रुग्णसंख्या कमी झालेली असली तरी योग्य ती खबरदारी घेणे गरजेचे आहे.

तसेच दोन वर्षानंतर निर्बंध शिथिल झाले असल्याने यावेळी हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जाण्याची शक्यता आहे. यामुळे पुन्हा एकदा लोकांची गर्दी होण्याची शक्यता आहे. यामुळे पुन्हा एकदा लोकांची गर्दी होण्याची शक्यता आहे. ही गर्दी कोरोना संसर्गवाढीला कारणीभूत ठरू नये म्हणून राज्य सरकारने हे सण साजरे करण्यासाठी नियमावली जारी केली आहे.

दरम्यान गृहविभागाने जारी केलेली नियमावली तसेच कोरोना प्रतिबंधक नियमांचेही पालन करावे, असे आवाहन राज्य सरकारकडून करण्यात आले आहे.

गृहविभागाने जारी केलेले नियम खालीलप्रमाणे

रात्री १० वाजताच्या आत होळी पेटवणे बंधनकारक आहे

होळीदरम्यान डीजे लावण्यावर कायदेशीर बंदी आहे.

दहावी तसेच बारावी वर्गाच्या परीक्षा सुरु असल्यामुळे लाऊडस्पीकरचा आवाज मोठा केल्यास कारवाई होईल.

होळी साजरी करताना मद्यपान तसेच बिभत्स वर्तन केल्यास कारवाई होईल.

होळी खेळताना महिला तसेच मुलींची खबरदारी घेण्याचे आवाहन.

कोणत्याही जातीधर्माच्या भावना दुखावतील अशा घोषणा देऊ नये.

धुलीवंदनाच्या दिवशी जबरदस्तीने रंग लावू नये, पाण्याचे फुगे फेकू नयेत.

होळी सणानिमित्त कोठेही आगी लागतील असे कृत्य करू नये

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!