भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

आरोग्यमहाराष्ट्र

‘ब्लॅक फंगस’चे राज्यात 90 मृत्यू; 1500 हुन अधिक रुग्ण,500 हून अधिक रुग्ण बरे…इंजेक्शन मात्र मिळेना

Monday To Monday NewsNetwork।

मुंबई(वृत्तसंस्था)। कोरोना महामारीमध्ये नागरिकांची चिंता वाढवणाऱ्या म्युकरमायकोसिस (Black Fungus) या आजाराने डोकं वर काढलं आहे. मागील काही दिवसांपासून या आजाराच्या रुग्णांमध्ये वेगाने वाढ होत आहे. महाराष्ट्रामध्ये आतापर्यंत 1500 हून अधिक रुग्ण आढळून आले असून त्यापैकी सुमारे 500 जण बरे झाले आहेत. तर आतापर्यंत 90 जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनावर उपचार घेत असलेल्या किंवा त्यातून बरे झालेल्या रुग्णांमध्ये हा आजार आढळून येत आहे. हा बुरशीजन्य आजार होण्याचे प्रमाण राज्यात मोठ्या प्रमाणात वाढले आहे. त्यातच या आजारासाठी लागणाऱ्या इंजेक्शनचा राज्यात तुटवडा आहे. याविषयी माहिती देताना राज्याच आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले, दरम्यान, इंजेक्शनचा पुरवठा सुरळित होण्यासाठी राज्य सरकार प्रयत्न करत आहे. राज्यात या आजाराचे सुमारे १५०० हून अधिक रुग्ण असून ५०० पेक्षा अधिक रुग्ण बरे झाल्याचेही त्यांनी सांगितले.  

सध्या ८०० ते ८५० रुग्णांवर उपचार सुरू आहेत. या आजारावरील उपचारांसाठी प्रभावी असलेल्या ॲम्फोटेरिसिन बी या इंजेक्शनची मागणी मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. या इंजेक्शनची केंद्र सरकारकडेही मागणी करण्यात आली आहे. तसेत औषध निर्मिती कंपन्यांकडेही ऑर्डर देण्यात आली आहे. पण त्याचा पुरवठा ३१ मेपर्यंत होणार असल्याचे कंपन्यांनी सांगितले आहे. त्यामुळे पुढील दहा दिवसांत इंजेक्शन उपलब्ध होण्याची शक्यता खूप कमी आहे. 

प्रत्येक रुग्णाला दररोज सहा ते सात इंजेक्शन द्यावी लागत आहेत. आजाराच्या तीव्रतेनुसार एका रुग्णाला सुमारे ६० ते १०० इंजेक्शन लागु शकतात, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. त्यामुळे राज्याकडून सध्या सुमारे दोन कोटी इंजेक्शनची मागणी करण्यात आली आहे. इंजेक्शनच्या साठ्यावर केंद्र सरकारचे नियंत्रण आहे. पण राज्यात रुग्णसंख्या अधिक असल्याने महाराष्ट्राला इंजेक्शनची अधिक गरज आहे. सध्या केवळ १६ हजार इंजेक्शन मिळाली आहेत.या इंजेक्शनचीही जागतिक निविदा काढली असल्याचे सांगत टोपे म्हणाले, केरॉन कंपनीला ५० हजार, एआयजी कंपनीला ६० हजार इंजेक्शनची ऑर्डर देण्यात आली आहे. पण या कंपन्या ३१ मेनंतरच इंजेक्शनचा पुरवठा करणार आहेत. आजारासाठी स्वतंत्र मार्गदर्शक सूचना तयार करण्यात आल्या आहेत. त्यानुसार डॉक्टरांना उपचार करावे लागतील. महात्मा ज्योतिराव आरोग्य योजनेतून रुग्णांना हे औषध मोफत उपलब्ध करून दिले जाणार आहे, असे टोपे म्हणाले. 

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!