भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईममहाराष्ट्र

अल्पवयीन तरुणीवर पोलीस उपनिरीक्षकाचा बलात्कार !

नागपूर,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। चक्क एका पोलिस उपनिरीक्षकावर बलात्काराचा गंभीर गुन्हा दाखल झाला असून त्या उपनिरीक्षकला अटकही करण्यात आली आहे. पोलिसावरच बलात्काराचा आरोप करण्यात आला असल्याने बलात्काराचा गंभीर गुन्हा दाखल झाल्यानंतर संपूर्ण नागपूर पोलीस दलाच एकच खळबळ माजली आहे

१७ वर्षांच्या अल्पवयीन तरुणीवर पोलीस उपनिरीक्षक असलेल्या प्रदीप कुमार नितवने याने १३ जुलैला चिखलदरा येथे नेऊन बलात्कार केला, असा आरोप करण्यात आला आहे. याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या प्रदीप कुमार नितवने याला पाच दिवसांची पोलीस कोठडीही सुनावण्यात आली आहे.

नात्यातीलच मुलीवर बलात्कार
नात्यातीलच असलेल्या १७ वर्षांच्या मुली ला चिखलदऱ्याला नेवून या मुलीवर त्याने बलात्कार केला,असा आरोप करण्यात आला आहे. ही मुलगी इयत्ता बारावीची विद्यार्थीनी आहे. ती नागपुरात पेईंग गेस्ट म्हणून राहत होती. बलात्काराच्या या घटनेनं नागपुरात खळबळ उडाली आहे. पीडित विद्यार्थीनी मूळची सावनेरची असल्याचीही माहिती समोर आली आहे.

नेमकं घडलं काय ?
प्रदीपकुमान नितवने ने बारावीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीला फूस लावून कारने चिखलदरा इथं घेऊन गेला होता.तिथे पोहोचल्यानंतर त्याने तिला काही संशयास्पद पेय प्यायला दिली. यानंतर शुद्ध हरपलेल्या अवस्थेत गेलेल्या मुलीवर प्रदीपने अतिप्रसंग केला. अल्पवयीन मुलीचं लैंगिक शोषण केल्यानंतर प्रदीपने मुलीला जीवे मारण्याची धमकीही दिली. झालेला प्रसंग कुणाला सांगितला तर तुझी खैर नाही, असं म्हणत पीडितेला धमकावण्यात आलं होतं. तरीही पीडितेनं आपल्या पालकांना घडलेली हकीकत सांगितल्यानंतर अखेर सीताबर्डी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. त्यानंतर आरोपी उपनिरीक्षकला अटक करण्यात आली आहे. आता पुढील तपास केला जातोय.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!