आत्महत्या प्रकरणी रेल्वेच्या तब्बल 16 अधिकारी कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल
मंडे टू मंडे वृत्तसंकलन।
नाशिक,मंडे टू मंडे वृत्तसेवा। रेल्वेच्या तब्बल १६ अधिकारी-कर्मचाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रेल्वेच्या वरिष्ठांच्या शारीरिक, मानसिक व आर्थिक छळाला कंटाळून आत्महत्या करत असल्याची चिठ्ठी लिहून एका कर्मचाऱ्याने आत्महत्या केली होती. त्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे.
रेल्वेच्या 16 अधिकारी कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल
मनमाड- औरंगाबाद दक्षिण मध्य रेल्वे मार्गावर तारूर रेल्वे स्टेशन हद्दीत रेल्वेत कर्मचारी असलेले गारखेडा येथील भाऊसाहेब विठ्ठल गायकवाड (वय ५१) यांनी रेल्वेच्या काही अधिकारी व कर्मचारींच्या त्रासाला कंटाळून सचखंड एक्स्प्रेससमोर स्वतः ला झोकून देत आत्महत्या केली होती. रेल्वेच्या वरिष्ठांच्या शारीरिक, मानसिक व आर्थिक छळाला कंटाळून आत्महत्या करत असल्याची चिठ्ठी लिहून चावीवाला या पदावर कार्यरत असलेले भाऊसाहेब विठ्ठल गायकवाड यांनी आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत १६ अधिकारी व कर्मचाऱ्यांचे नाव असल्याने एकच खळबळ उडाली होती.
कर्मचाऱ्यास आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा ठपका
या अनुषंगाने भाऊसाहेब गायकवाड यांच्या मुलीच्या तक्रारीवरून तालुका पोलिसात नगरसूल, लासूर, रोटेगाव, तारुर रेल्वेस्थानकात कार्यरत असलेल्या सोळा जणांवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तालुका पोलिस तपास करत आहेत. या प्रकरणी रेल्वेच्या १६ अधिकारी-कर्मचाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.