भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईमजळगावनशिराबाद

अवैध वाळू वाहतुकीवर नशिराबाद पोलिसांची कारवाई ; २५ ब्रास वाळूसह ट्रॅक्टर जप्त

नशिराबाद. मंडे टु मंडे न्युज. डॉ.दीपक लोखंडे | नशिराबाद पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शेळगाव परिसरात अवैध वाळू वाहतूक व साठवणुकीविरोधात नशिराबाद पोलिसांनी कारवाई करत सुमारे २५ ब्रास वाळू आणि एक ट्रॅक्टर असा एकूण ४ लाख ६ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी अवैध वाळू वाहतूक तसेच नदीपात्रालगत वाळूचा अवैध साठा करणाऱ्या एकूण चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नशिराबाद पोलीस ठाण्याचे पथक २२ ऑगस्ट रोजी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास शेळगाव परिसरात पेट्रोलिंग करीत असताना अवैध वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर निदर्शनास आले. पोलिसांनी ट्रॅक्टर थांबवून चालकाकडे चौकशी केली असता त्याच्याकडे वाळू वाहतुकीचा कोणताही वैध परवाना अथवा आवश्यक कागदपत्रे आढळून आली नाहीत.

चालकाची अधिक चौकशी केली असता सदर वाळू शेळगावकडील तापी नदीपात्राजवळील गायरण जागेत त्याने व त्याच्या साथीदारांनी केलेल्या अवैध साठ्यातून भरून आणल्याची माहिती त्याने पोलिसांना दिली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी संबंधित ठिकाणी जाऊन पाहणी केली असता मोठ्या प्रमाणात अवैधरीत्या साठवून ठेवलेली वाळू आढळून आली.

पोलिसांनी कारवाई करत २५ ब्रास वाळू तसेच एक ट्रॅक्टर, असा एकूण ₹४,०६,००० किमतीचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी अवैध वाळू वाहतूक व नदीपात्रालगत अवैध वाळूचा साठा केल्याप्रकरणी एकूण चार आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास नशिराबाद पोलीस ठाण्याचे सफौ/१६३ संजय महाजन करीत आहेत.

ही कारवाई पोलीस अधीक्षक श्री. श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक श्री. संदीप गावीत्त, उपविभागीय पोलीस अधिकारी भुसावळ भाग श्री. केदार बारबोले यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीमती योगिता नारखेडे यांच्या सूचनेनुसार करण्यात आली.कारवाईत पथकातील पोहेकॉ गुणवंत देशमुख, पोहेकॉ गिरीष शिंदे, पोकोभरत बाविस्कर, पोकॉ पंकज सोनवणे आणि चासपो रियाजोद्दीन काझी यांनी सहभाग घेतला.

नशिराबाद पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध वाळू उत्खनन, वाहतूक व साठवणूक करणाऱ्यांविरुद्ध यापुढेही कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. नागरिकांनी अशा प्रकारची अवैध वाळू वाहतूक किंवा साठवणूक आढळल्यास नशिराबाद पोलिसांना माहिती देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!