भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

मुक्ताईनगर

मुक्ताईनगरमध्ये जागतिक छायाचित्रकार दिन हरताळा येथे निसर्गरम्य वातावरणात उत्साहात साजरा

मुक्ताईनगर.मंडे टु मंडे न्युज. अक्षय काठोके | मुक्ताईनगर तालुक्यातील फोटोग्राफर बांधवांनी जागतिक छायाचित्रकार दिन मोठ्या उत्साहात साजरा केला. हरताळा येथील निसर्गरम्य वातावरणात आयोजित करण्यात आलेल्या या सोहळ्यात तालुक्यातील संपूर्ण फोटोग्राफर बांधवांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.

कार्यक्रमाची सुरुवात विधिवत कॅमेरा पूजन करून करण्यात आली. यावेळी उपस्थित फोटोग्राफर बांधवांनी एकमेकांना जागतिक छायाचित्रकार दिनाच्या शुभेच्छा देत आनंद साजरा केला.

निसर्गाच्या सान्निध्यात पार पडलेल्या या कार्यक्रमात फोटोग्राफर बांधवांमध्ये उत्साहाचे वातावरण दिसून आले. छायाचित्रण क्षेत्रातील विविध अनुभव, आठवणी आणि गप्पांमुळे कार्यक्रमात आनंदाचे वातावरण निर्माण झाले.कार्यक्रमानंतर सर्व फोटोग्राफर बांधवांनी एकत्रितपणे स्नेहभोजनाचा आस्वाद घेतला. यावेळी उपस्थित सर्वांच्या चेहऱ्यावर आनंद आणि समाधान पाहायला मिळाले.

हरताळा येथील निसर्गरम्य वातावरणात पार पडलेला हा सोहळा मुक्ताईनगर तालुक्यातील फोटोग्राफर बांधवांसाठी एक संस्मरणीय क्षण ठरला. या निमित्ताने तालुक्यातील फोटोग्राफर बांधवांची एकजूट आणि मैत्री अधिक दृढ झाल्याचे चित्र दिसून आले.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!