भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

राष्ट्रीय

भयंकर! पिठाच्या गिरणीत केस अडकल्याने महिलेचं शीर धडावेगळं होऊन झाला मृत्यू

मंडे टू मंडे वृत्तसंकलन।

नवी दिल्ली (वृत्तसेवा) : नेहमीच्या पिठाच्या गिरणीत केस अडकायचं निमित्त एका महिलेच्या भयंकर अंताला कारणीभूत ठरलं. क्षणिक दुर्लक्ष थेट तिला जीवानिशी घेऊन गेलं. पंजाबच्या फिरोजपूर मधून एक अत्यंत वेदनादायी घटना समोर आली आहे.फिरोजपूरमधील एका गावात पीठ दळण्याच्या गिरणीमध्ये अडकून एका कामगार महिलेचा मृत्यू झाला आहे.

गिरणीमध्ये धान्य दळण्यासाठी टाकलेलं असतानाच सुरुवातीला महिलेचे केस अचानक या गिरणीमध्ये अडकले. यानंतर महिलेचं डोकंही गिरणीमध्ये ओढलं गेलं. या घटनेत संबंधित महिलेचं डोकं धडावेगळं झालं. ही घटना इतकी भयंकर होती, की यात महिलेचा जागीच मृत्यू झाला. ही महिला फिरोजपूरमधील एका पीठाच्या गिरणीवर काम करत होती. मिळालेल्या माहितीनुसार, मृत महिला बलजीत कौर 30 वर्षांची महिला सेखवान गावातील रहिवासी होती. पीठाच्या गिरणीमध्ये धान्य दळण्यासाठी एक ग्राहक आला होता. यादरम्यान ग्राहकाच्या समोरच हा संपूर्ण प्रकार घडला.

या घटनेनंतर महिलेच्या कुटुंबातील सदस्यांनी हळहळ व्यक्त केली आहे. याबद्दल माहिती मिळताच काही वेळातच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत घटनेची पाहणी केली. तसंच महिलेचं शरीर शवविच्छेदनासाठी पाठवलं. सोबतच या घटनेची नोंददेखील करुन घेण्यात आली. घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!