भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

जळगाव

डॉ. उल्हास पाटील रूग्णालयात पर्यावरण दिनानिमित्त ३५१ रोपट्यांचे रोपण

जळगाव, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | येथील डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालया तर्फे जागतिक पर्यावरण दिनानिमित्त ३५१ विविध प्रकारच्या रोपट्यांचे रोपण करण्यात आले. तसेच प्रत्येक विद्यार्थ्याने या रोपट्याचे संवर्धन करण्याची जबाबदारी देखिल घेतली आहे.

याप्रसंगी वैद्यकीय महाविद्यालयाचे संचालक डॉ. एन.एस. आर्विकर, डीन डॉ. प्रशांत सोळंके, रजीस्ट्रार प्रमोद भिरूड, महाविद्यालयाचे जनरल सेके्रटरी शिवराज दाभाडे यांच्यासह प्राध्यापक व विद्यार्थी उपस्थित होते. यावेळी महाविद्यालयातील परिसरात स्वच्छता मोहीम देखिल राबविण्यात आली. तसेच बायोमेडीकल कचर्‍याचे विलगीकरण करून त्याची विल्हेवाट लावण्यात आली.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!