सांभाळा : एक कोरोनाग्रस्त महिन्याभरात ४०६ जणांना संसर्ग पसरवतो–आरोग्य मंत्रालय
Monday To Monday NewsNetwork।
नाविदिल्ली(वृत्तसंस्था)। देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने कहर केला आहे. काही राज्यांमध्ये कोरोना प्रादुर्भाव जरी कमी होताना दिसत असला तरी काही राज्यांमध्ये कोरोना वाढत आहे. अनेक राज्यांमध्ये कोरोनाला थोपवून लावण्यासाठी लॉकडाऊन आणि नाईट कर्फ्यू जारी केला आहे. सुरुवातीपासूनचे कोरोनापासून बचाव करण्यासाठी सरकार सातत्याने लोकांना मास्क लावा, सोशल डिस्टन्सिंग पाळा असे सांगत आहे. परंतु अनेक लोक ही बाब गांभीर्याने घेत नाही , अजूनही काही लोकं मात्र सरकारचं ऐकतं नसल्याचे दिसत आहे. कारण आजच केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार भारतात ५० टक्के लोकं मास्क घालत नसल्याचे समोर आले आहे. यादरम्यानच एक कोरोनाग्रस्त महिन्याभरात ४०६ जणांचा संसर्ग पसवरतो, अशी माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. ते कसे जाणून घ्या
दर आठवड्याला देशातील कोरोना परिस्थितीचा आढावा देण्यासाठी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाची पत्रकार परिषद पार पडते. आजही केंद्रीय आरोग्य मंत्रालयाची ही पत्रकार परिषद पार पडली. त्यावेळेस सांगण्यात आले की, जर एखाद्या व्यक्तीने सोशल डिस्टन्सिंगचे पालन केले नाहीतर तो व्यक्ती एका महिन्यात ४०६ जणांना संसर्ग पसरवतो. ही सर्वात महत्वाची सामाजिक लस आहे.लोकांना गांभीर्य नसल्याने ही परिस्थिती आहे.