रब्बी हंगाम पिक स्पर्धेत विरोदा येथील नितीन चौधरी यांचा गौरव
विरोदा, ता. यावल. मंडे टु मंडे न्युज प्रतिनिधी | नुकत्याच झालेल्या कृषी दिनानिमित्त यावल तालुक्यातील डोंगर कोठोरा येथे विरोदा येथील प्रगतशील शेतकरी नितीन भागवत चौधरी यांना तालुकास्तरीय रब्बी हंगाम पिक स्पर्धा हरभरा पिक सन 2023-24 मध्ये प्रथम क्रमांक मिळवल्या बद्दल त्यांना यावल तहसीलदार मोहनमला नाझीरकर यांच्याहस्ते प्रशस्तीपत्र सन्मान चिन्ह व पाच हजार रुपये देऊन सन्मानित करण्यात आले.
या वेळी बदलत्या हवामानातील शेती, कीड रोग नियंत्रण, उत्पादन वाढीसाठी तंत्रज्ञान व वैज्ञानिक शेती याविषयी तहसीलदार मोहन मला नाझीरकर यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले तर माजी मुख्यमंत्री स्व. वसंतराव नाईक यांच्या जीवन कार्याची माहिती दिली तसेच कार्यक्रमात कृषी विभागात तर्फे पीक उत्पादन स्पर्धेचे बक्षीस वितरण करण्यात आले या प्रसंगी तहसीलदार मोहन माला नाझीरकर ,गटविकास अधिकारी डॉ. मंजुश्री गायकवाड, तालुका कृषी अधिकारी भरत वारे, मंडळ कृषी अधिकारी भालचंद ढाले, उप कृषी अधिकारी महेश आगीवाल, व सहाय्यक कृषी अधिकारी महेंद्र पाटील व इतर शेतकरी व मान्यवर उपस्थित होते
