भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईमजळगाव

पाचशेच्या बनावट नोटा प्रकरणी महिलेला अटक

जळगाव, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | पाचशे रुपयांच्या बनावट नोटा चलनात आणल्या प्रकरणी जिल्हा पेठ पोलिसांनी मोठी कारवाई करत छत्रपती संभाजीनगर येथून कोकिळा रघुनाथ मंगरुळे या महिलेला अटक केली असून या महिलेले शहराच्या वेगवेगळ्या भागांत तब्बल २४ हजार रुपये किमतीच्या बनावट नोटा वापरल्याचे समोर आले आहे.

दि.२७ जून रोजी स्थानिक गुन्हे शाखेने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या प्रवेशद्वारा जवळून सचिन दरबारसिंग राजपूत (वय ३४) आणि सचिन संजय गोसावी (वय २३) या दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून ६ हजार रुपयेu किमतीच्या १२ बनावट नोटा हस्तगत करण्यात आल्या होत्या. या प्रकरणी जिल्हा पेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून चौकशीदरम्यान, या दोघांनी यापूर्वीच २४ हजार रुपयांच्या बनावट नोटा बाजारात आणल्याची माहिती समोर आली होती, ज्यामुळे पोलीस आता या नोटांचाही शोध घेत आहेत.

ज्या भागात या नोटा चालविल्या गेल्या, त्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास पोलिसांनी सुरुवात केली आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर, पोलिसांनी विजय प्रभुलाल माहोरे (वय ३८) यालाही अटक केली. विजय माहोरेने दिलेल्या माहितीनुसार, त्याने या बनावट नोटा छत्रपती संभाजीनगर येथील कोकिळा रघुनाथ मंगरुळे (वय ४०) या महिलेकडून घेतल्या होत्या. या माहितीच्या आधारे पोलिसांनी कोकिळा मंगरुळेला अटक केली आहे. या बनावट नोटांच्या रॅकेटचा अधिक तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक गोपाल देशमुख करत आहेत

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!