बिग ब्रेकिंग : आता खरात पॅटर्न टु : संस्था चालकाकडून १२१ महिलांचे लैंगिक शोषण ; टॅब मधील ८१ व्हिडिओंनी ६३ वर्षीय एरंडे चा बुरखा फाडला
नाशिक, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | राज्यातील नाशिक मधून आणखी एक धक्कादायक घटना उघडकीस आली असून नाशिक हे शहर लैंगिक शोषणाचे केंद्रबिंदू बनू पाहत असल्याची स्थिती आहे. नाशिकच्या सातपूर परिसरामध्ये एका बड्या व्यावसायिकाचे आक्षेपार्ह व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत त्याच्याकडून १२ लाख रुपयांची खंडणी मागण्यात आली होती. याप्रकरणाचा तपास करताना पोलिसांनी त्या चार चोरांना अटक केली. त्यानंतर पोलिसांना या अश्लील व्हिडीओमागे काहीतरी दडलंय अशा संशय आला होता. त्यांनी तपास सुरु ठेवला आणि महिलांना पुढे येण्याचे आवाहन केलं. त्यानंतर एका महिलेने व्यावसायिक आणि एनजीओ संचालक रवींद्र एरंडे .वय ६३ वर्ष. यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. एरंडे सह त्याचे इतर साथीदार आकाश बकरे, प्रकाश पानपाटील, सूरज गवई, श्रीपत शिंदे यांना देखील पोलिसांनी ताब्यात घेतल आहे .उद्योजक आणि एनजीओ संचालकाकडून १२१ हुन अधिक महिलांचे लैंगिक शोषण झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या घटनेकडे खरात पार्ट -२ म्हणून बघितले जात आहे.
नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात प्रकरण महाराष्ट्रात गाजत आहे. याप्रकरणात दररोज नवंनवीन खुलासे होत आहे. या व्यक्ती भोंदूगिरीच्या नावाखाली महिलांच नाही तर व्यावसायिकांनाही लुटलं आहे. त्यांची गुन्हेगारी जगातील कारनामे तपासात समोर येत आहे. अशातच नाशिकमध्ये अजून एका अशोक खरात पॅटर्न टु. समोर आलं आहे. सातपूरमधील व्यावसायिकाचा टॅब चोरीला गेला होता. ज्यात २०० हून अधिक अश्लील व्हिडीओ सापडले आहेत. पोलिसांनी या प्रकरणात महिलांना समोर येऊन गुन्हा दाखल करण्याचे आवाहन केलं होतं. त्यानंतर त्या व्यावसायिकावर पहिला गुन्हा दाखल झाला आहे.
संशयित आरोपी रवींद्र एरंडे .वय ६३ वर्ष. याला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. गरजू महिलांचे आक्षेपार्य व्हिडीओ बनवून लैंगिक शोषण केल्याप्रकरणी खंडणीचा गुन्हा दाखल करणाऱ्या या व्यावसायिका विरोधातच पीडित महिलेकडून पहिला गुन्ह्याची नोंद झली आहे. टॅबमध्ये पोलिसांना ८७ आक्षेपार्ह व्हिडीओ सापडले त्यानंतर हे प्रकरण उघडकीस आले. पोलिसांनी ४ मोबाईल, २ पेनड्राईव्ह, १ मेमरी कार्ड जप्त केली आहेत. गरजू महिलांना नोकरीचे आमिष दाखवून शोषण केल्याचा आरोप व्यावसायिक रवींद्र एरंडे यांच्यावर करण्यात आला आहे.
पोलिसां कडून मिळालेल्या माहितीनुसार नाशिक आणि इगतपुरीतील हॉटेलमध्ये अत्याचार करुन तो गुपचूप चित्रीकरण करायचा. त्यानंतर या व्हिडीओच्या माध्यमातून तो गरजू महिलांना त्रास देत असे. एवढंच नाही तर अश्लील व्हिडीओ ‘ब्लू फिल्म’ स्वरूपात विक्रीचा देखील संशय पोलिसांना आहे. त्यादिशेने पोलीस पुढचा तपास करत आहेत. महिलांना ब्लॅकमेलिंगद्वारे पैशांची मागणी झाली का या बाबत देखील पोसीस तपास करत आहेत. चौकशी दरम्यान असं समोर आलं की, पीडितांमध्ये अंगणवाडी सेविका, आशा वर्कर, कंपनी कामगार आणि घरकाम करणाऱ्या महिलांचा समावेश आहे. आरोपीवर बलात्कार आणि ॲट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आला आहे. प्रकरणातील इतर स्पॉट्स आणि लिंकचा पोलिसांकडून सखोल तपास सुरू असून पोलिस तपासात आणखी काय काय समोर येतं तेच पाहावं लागणार आहे.
