भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

जळगाव

तरसोद गणपती मंदिरावर हजारो भाविकांची गर्दी  ; पार्किंगची व्यवस्था नसल्याने मंदिरा समोरच वाहतुकीची कोंडी

नशिराबाद, मंडे टु मंडे न्युज. डॉ . दीपक लोखंडे | जळगाव जिल्ह्यातील तरसोदे येथील जागृत देवस्थान गणपती मंदिरात दररोज तसेच विशेषतः संकष्टी चतुर्थी, विनायक चतुर्थी, अंगारकी चतुर्थी आणि सुट्टीच्या दिवशी हजारो भाविक दर्शनासाठी मोठ्या श्रद्धेने येत असतात. भाविक आपल्या मनोकामना पूर्ण होण्यासाठी गणपती बाप्पाला साकडे घालत असल्याने मंदिर परिसर नेहमीच गजबजलेला असतो.सकाळ पासून भाविक येत असतात व संध्याकाळी भाविकांची गर्दी जास्त असते. मात्र मंदिरा समोरील रस्त्यावर दोन्ही बाजूंनी नारळ, फुले, प्रसाद आदींचे स्टॉल मोठ्या प्रमाणात लागलेले असतात. त्याच प्रमाणे दुचाकी वाहने सुद्धा मंदिराच्या समोर लागलेली असतात.


त्यामुळे रस्त्याची रुंदी कमी होऊन वाहनांच्या ये-जा करण्यास अडचणी निर्माण होतात. विशेषतः चारचाकी वाहनांसाठी पुरेशी जागा नसतानाही अनेक वाहनधारक मंदिरासमोरच गाड्या उभ्या करतात. परिणामी वाहतुकीची कोंडी होऊन भाविकांना मोठा त्रास सहन करावा लागतो.
मंदिर परिसरात वाहनतळाची (पार्किंग) योग्य व्यवस्था नसल्याने भाविकांना आपली वाहने रस्त्यावरच उभी करावी लागतात. यामुळे वाहनधारकांमध्ये वाद होण्याची शक्यता देखील वाढली आहे. वाढती गर्दी आणि अपुरी व्यवस्था यामुळे स्थानिक नागरिकही त्रस्त झाले आहेत.


या पार्श्वभूमीवर ग्रामस्थ, ग्रामपंचायत तसेच प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज व्यक्त होत आहे. मंदिराच्या नशिराबाद बाजूस किमान १०० मीटर अंतरावर चारचाकी वाहनांसाठी स्वतंत्र पार्किंगची व्यवस्था करून वाहनधारकांना तेथेच गाड्या उभ्या करण्याची सक्ती करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.योग्य नियोजन व कडक अंमलबजावणी केल्यास वाहतुकीची कोंडी टाळता येईल आणि भाविकांना सुरळीत व सुरक्षित दर्शन घेता येईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!