आता आई आणि बाळाला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्याआधीच मिळणार जन्म प्रमाणपत्र
मुंबई, मंडे टु मंडे न्युज | जन्म प्रमाणपत्र मिळण्याची प्रक्रिया आता आणखी सोपी आणि सुरळीत झाली असून भारताचे महानिबंधक (रजिस्ट्रार जनरल-RGI) यांनी जन्म प्रमाणपत्र देण्याच्या प्रक्रियेत काही महत्त्वाचे बदल केले आहेत. या बाबत १२ जून २०२५ रोजी एक नोटीस काढण्यात आली. त्यात असे निर्देश देण्यात आले की, यापुढं सर्व रुग्णालयांनी आणि विशेषतः सरकारी रुग्णालयांनी बाळाच्या जन्मानंतर आईला रुग्णालयातून सुटी देण्यापूर्वी जन्म प्रमाणपत्र देण्यात यावे.
यापूर्वीही महानिबंधक कार्यालयानं सरकारी आणि खासगी रुग्णालयांना कायद्याचे पालन होत नसल्याच्या मुद्द्यावरून इशारा दिला होता. आता १२ जूनच्या नवीन निर्देशांमध्ये जन्मानंतर लगेचच बाळाचे प्रमाणपत्र देणे बंधनकारक असेल, याबाबत स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत.
भारतात जन्म आणि मृत्यू नोंदणी (RBD) कायदा १९६९ च्या कलम १२ अंतर्गत जन्म प्रमाणपत्र (बर्थ सर्टिफिकेट) जारी केले जाते. या कायद्यात २०२३ मध्ये दुरुस्ती करण्यात आली आहे.
जन्म प्रमाणपत्र देण्याच्या प्रक्रियेत आजवर अनेक अनियमितता आढळून आल्या आहेत. फोटो स्रोत,RGICCI
फोटो कॅप्शन,जन्म प्रमाणपत्र देण्याच्या प्रक्रियेत आजवर अनेक अनियमितता आढळून आल्या आहेत. त्यानंतर आता भारताच्या महानिबंधकांनी यासाठीची प्रक्रिया बदलली असून बाळाच्या जन्मानंतर नोंदणी प्रक्रिया पूर्ण होताच रजिस्ट्रारला सात दिवसांच्या आत इलेक्ट्रॉनिक किंवा इतर माध्यमातून कलम ८ आणि ९ अंतर्गत जन्म प्रमाणपत्र जारी करावे लागेल, असे निर्देश दिले आहेत. बाळाच्या आईला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यापूर्वी तिच्याकडे प्रमाणपत्र सोपवले जाईल याची खातरजमा करावी असंही नोटीसमध्ये म्हटलं आहे.
देशातील सर्व राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांना याबाबतचे निर्देश देण्यात आले आहेत. त्यात सर्व सरकारी आणि खासगी रुग्णालयांचा समावेश आहे. अनेक सरकारी आणि खासगी रुग्णालयांमध्ये जन्म प्रमाणपत्रांशी संबंधित कायदेशीर प्रक्रियांचे पालन केले जात नसल्याचं भारताच्या रजिस्ट्रार जनरल यांना आढळून आलं होतं. त्यामुळं याबाबतचे निर्देश जारी करण्यात आले आहेत.

