चीननंतर आता दक्षिण कोरियात कोरोनाचा उद्रेक,जगभरात कोरोनाची चौथी लाट येणार?
मंडे टू मंडे वृत्तसंकलन।
नवी दल्ली,मंडे टू मंडे वृत्तसेवा। चीनमध्ये पुन्हा एकदा कोरोनाच्या रुग्णसंख्येत मोठी वाढ झाल्याने जगभरात चिंता व्यक्त केली जात आहे. त्याचत आता दक्षिण कोरियामध्येही कोरोनाचा उद्रेक झाल्याचं दिसून येतय. दक्षिण कोरियामध्ये एकाच दिवसात तब्बल चार लाख कोरोनाची रुग्णसंख्या वाढली आहे. कोरियामध्ये वाढलेल्या या रुग्णसंख्येला ओमायक्रॉन व्हेरिएंट जबाबदार असल्याचं सांगितलं जातं.
दक्षिण कोरियाच्या माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, त्या देशात बुधवारी 4,00,071 रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. गेल्या वर्षीच्या जानेवारी महिन्यानंतर एकाच दिवसात झालेली ही सर्वात मोठी वाढ आहे. स्थानिक पातळीवर कोरोनाचा संसर्ग झाल्याने रुग्णसंख्येत वाढ झाल्याचं सांगण्यात येतंय.
त्या आधी मंगळवारी दक्षिण कोरियामध्ये 293 मृत्यूंची नोंद करण्यात आली होती. चीननंतर आता दक्षिण कोरियातही कोरोनाचा उद्रेक झाल्यानंतर जगभरात कोरोनाची चौथी लाट येणार अशीही भीती व्यक्त केली जात आहे.
दरम्यान चीनच्या जिलीन प्रांताची राजधानी चांगचुनमध्ये शुक्रवारपासून लॉकडाऊन लावण्यात आला आहे. या शहरातील 90 लाख नागरिकांना एमर्ज्नसी अलर्टनंतर घरात राहण्याचे आदेश देण्यात आले आहे. शेडोंगमधील युचेंगमध्ये देखील लॉकडाऊनचे आदेश देण्यात आले होते. युचेंगमध्ये 5 लाख नागरिक राहतात. सध्या चीनच्या तीन शहरांमध्ये लॉकडाऊन लावण्यात आला आहे. लॉकडाऊनमुळे 2,65,00,000 नागरिकांना घरात राहण्याचे आदेश देण्यात आले आहे