भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईमजळगाव

शासकीय कामात अडथळा, मुख्याध्यापकावर गुन्हा दाखल

नशिराबाद, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | शासकीय कामात अडथळा निर्माण केल्या प्रकरणी जळगाव तालुक्यातील नशिराबाद येथील के.एस.टी. उर्दू शाळेचे मुख्याध्यापक वसीम अक्रम शेख मुसा आणि त्यांचे सहकारी शकील शेख मुसा या दोघांविरोधात शुक्रवार २७ जून रोजी रात्री ९ वाजता नशिराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

मिळालेल्या माहितीनुसार , जळगाव जिल्हा परिषदेच्या उपशिक्षणाधिकारी रागिणी चव्हाण यांच्यासह त्यांच्या कार्यालयातील प्रशासनाधिकारी शुक्रवार २७ जून रोजी दुपारी २ वाजता के.एस.टी. उर्दू शाळेच्या तपासणीसाठी (इन्स्पेक्शन) गेले होते. त्यावेळी शाळा बंद होती आणि शाळेला कुलूप लावलेले होते. यामुळे रागिणी चव्हाण यांच्या सहकारी सरला पाटील यांनी मुख्याध्यापक वसीम अक्रम शेख मुसा आणि शकील शेख मुसा (दोघे रा. नशिराबाद) यांना फोन करून शाळेत येण्यास सांगितले.

मात्र, दोघांनीही शाळेत येण्यास स्पष्ट नकार दिला आणि शासकीय कामात अडथळा निर्माण केला. या प्रकारामुळे प्रशासकीय कामात व्यत्यय निर्माण झाला. या प्रकरणी सरला पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून, नशिराबाद पोलीस ठाण्यात मुख्याध्यापक वसीम अक्रम शेख मुसा आणि शकील शेख मुसा यांच्या विरोधात शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!