रेल्वे प्रवाशांकडून जबरदस्तीने पैसे वसूल करणाऱ्या तृतीयपंथीयांच्या टोळीला अटक
भुसावळ, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | भुसावळ स्थानकावरून धावणाऱ्या रेल्वे गाड्यांमधील प्रवाशांना धमकावून जबरदस्तीने त्यांच्याकडून पैसे लुबळणाऱ्या किंवा रोख रक्कम नसेल तर ऑनलाईन रक्कम लुबाडणार्या ८ तृतीयपंथीयांच्या टोळीला रेल्वे सुरक्षा बलाने अटक केली.
हे तृतीयपंथी प्रवाशांना धमकावत होते. शिवाय रोख रक्कम नाही म्हणणार्या प्रवाशांपुढे स्कॅनर (QR कोड) पुढे करीत शंभर ते दोनशे रुपयांची रक्कम जबरदस्तीने ऑनलाईन वसुल करीत होते. आरोपींच्या फोन पे रेकॉर्डमध्ये अनेक ट्रान्झेक्शन अशा पद्धत्तीने आढळले आहेत.
या संदर्भात या पूर्वी अनेक प्रवाशांनी सोशल मीडियावर आणि रेल्वे हेल्पलाईनवर अशा त्रासाची तक्रार केली होती.
या माहितीच्या आधारे दिनांक २५ व २६ जून च्या रात्री रेल्वेचे वरिष्ठ मंडळ सुरक्षा आयुक्त चित्रेश जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक के.एन. राय (क्राईम ब्रांच) आणि निरीक्षक पी.आर. मीना यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथकाने
भुसावळ मार्गावरील गाड्यांमध्ये धडक कारवाई करीत ६ तृतीयपंथी आणि त्यांच्या दोन मुख्य साथीदार याना रंगेहाथ पकडण्यात आले. त्यांच्या मोबाईलची तपासणी केली असता आरोपींच्या फोन पे रेकॉर्डमध्ये अनेक ट्रान्झेक्शन अशा पद्धत्तीने आढळले आहेत.
गुरुवार रोजी तृतीयपंथींना भुसावळ न्यायालयात हजर करण्यात आल्यानंतर उपलब्ध पुराव्यांच्या आधारे न्यायालयाने त्यांना १ महिन्याची शिक्षा सुनावली. तृतीयपंथीयांना जळगाव कारागृहात हलवण्यात आले असून या कारवाईने रेल्वे प्रवाशांमध्ये समाधान व्यक्त केले जात असून प्रवाशांच्या सुरक्षेला प्राधान्य असून या पुढे देखील रेल्वे सुरक्षा बलाची कारवाई सुरूच राहील, असे रेल्वेचे वरिष्ठ मंडळ सुरक्षा आयुक्त चित्रेश जोशी यांनी सांगितले.


