ओबीसी समाजासाठी शासनाच्या १३ महामंडळांचे जिल्हास्तरावर कामकाज सुरु..विविध कार्ज व व्याज परतावा योर्जनांसाठी पात्र लाभार्थ्यांना ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन
मुंबई, मंडे टु मंडे न्युज | इतर मागासवर्गीय समाजाच्या सर्वागीण सामाजिक व आर्थिक विकासासाठी महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ तसेच त्याअंतर्गत कार्यरत १३ उपमहामंडळांची स्थापना केली असून, या महामंडळांचे जिल्हा स्तरावर कामकाज सुरू करण्यात आले आहे. विविध कर्ज व आर्थिक सहाव्य योजनांचा लाभ घेण्यासाठी पात्र लाभार्थीनी ऑन्लाईन नोंदणी करून अर्ज करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.
शासनाने विविध समाजघटकांच्या आर्थिक उन्नतीसाठी स्वतंत महामंडळांची स्थापना केली आहे. त्यामध्ये जगज्योती महात्मा बसवेवर आर्थिक विकास महामंडळ (लिंगायत वाणी), संत कार्शिवा गुरव युवा आर्थिक विकास महामंडळ (गुरव समाज), संत सेनाजी महाराज केसशिल्पी महामंडळ (न्हावी समाज), लेवा पाटीदार समाज आर्थिक विकास महामंडळ (लेवा समाज), सोळा कुलस्वामिनी आर्थिक विकास महामंडळ (लाडशालीय वाणी/वाणी), स्व. विष्णुपंत रामचंद्र दादरे (लोणारी) विकास महामंडळ (लोणारी समाज), संत नामदेव महाराज शिंपी समाज आर्थिक विकास महामंडळ (शिंपी समाज), संत भोजलिंग सुतार समाज आर्थिक विकास महामंडळ (सुतार समाज), सरदार वल्लभभाई पटेल गुजर समाज आर्थिक विकास मामंडळ, संगजर महाराज आर्थिक विकास महामंडळ (सोनार समाज), संत श्री. रूपलाल महाराज आर्थिक विकास महामंडळ (बारी समाज) आणि आगरी समाज आर्थिक विकास महामंडळ (आगरी समाज) यांचा समावेश आहे.
या महामंडळांमार्फत लाभार्थ्यांसाठी सहा योजना पूर्णपणे ऑन्लाईन स्वरूपात राबविण्यात येत आहेत. त्यामध्ये थेट कर्ज योजना (रू. १ लाखांपर्वत बिनव्याजी कर्ज), २० टक्के बीज भांडवल योजना, वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना, गट कर्ज व्याज परतावा योजना, शैक्षाणिक कर्ज व्याज परतावा योजना आणि महिला स्वयंसिद्धी व्याज परतावा योजना यांचा समावेश आहे. या योजनांचा लाभ घेण्यासाठी पात्र अर्जदवारांनी आवश्यक कागदपत्रांसह www.msobcfdc.org या वेब पोर्टलवर ऑन्लाईन अर्ज करणे अनिवार्य आहे. सर्व प्रक्रिया ऑन्लाईन असल्याने अर्जदारांनी विहित मुदतीत अर्ज सादतर करून शासनाच्या योजनांचा लाभ घ्यावा, असेही आवाहन करण्यात आले आहे.
शासनाच्या १३ उपमहामंडळांची यादी
१) जगज्योती महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळ (लिंगायत वाणी)
२) संत कार्शित्रा गुरव युवा आर्थिक विकास महामंडळ (गुरव समाज)
३) संत सेनाजी महाराज केसशिल्पी महामंडळ (न्हावी समाज)
४) लेवा पाटीदार समाज आर्थिक विकास महामंडळ (लेवा समाज)
५) सोलवा कुलस्वामिनी आर्थिक विकास महामंडळ (लाडशालीय वाणी/वाणी)
६) स्व. विष्णुपंत रामचंद्र दादरे (लोणारी) आर्थिक विकास महामंडळ (लोणारी समाज)
७) संत नामदेव महाराज शिंपी समाज आर्थिक विकास महामंडळ (शिंपी समाज)
८) संत भोजलिंग काका सुतार समाज आर्थिक विकास महामंडळ (सुतार समाज)
९) सरदार वल्लभभाई पटेल गुजर समाज आर्थिक विकास महामंडळ (गुजर समाज)
१०) संत नरहरी महाराज आर्थिक विकास महामंडळ (सोनार समाज)
११) संताजी महाराज आर्थिक विकास महामंडळ (तेली समाज)
१२) संत श्री. रूपलाल महाराज आर्थिक विकास महामंडळ (वारी समाज)
१३) आगरी समाज आर्थिक विकास महामंडळ (आगरी समाज)
ऑनलाईन सहा योजना
१) थेट कर्ज योजना (रु. १ लाखांपर्यंत विनव्याजी कर्ज)
२) २० टक्के बीज भांडवल योजना
३) वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना
४) गट कर्ज व्याज परतावा योजना
५) शैक्षणिक कर्ज व्याज परतावा योजना
६) महिला स्वयंसिद्धी व्याज परतावा योजना


