ब्रेकिंग : मराठवाडा हादरला! मध्यरात्री गाढ झोपेत असताना २ तासात ४ वेळा भूकंपाचे धक्के.. नागरिक भयभीत..
मंडे टु मंडे न्युज | राज्यातील मराठवाड्यातील हिंगोली, नांदेड आणि परभणी जिल्ह्यांत ९ जुलै २०२६ रोजी मध्यरात्री भूकंपाचे ४ सौम्य धक्के जाणवले. पहिला धक्का रात्री १:३७ वाजता बसला, तर त्यानंतर ३:२३ वाजेपर्यंत एकापाठोपाठ धक्के बसल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. या धक्क्यांची तीव्रता रिश्टर स्केलवर ३.६ ते ४.६ च्या दरम्यान नोंदवली गेली, मात्र कोणतीही जीवित वा वित्तहानी झाल्याची अद्याप माहिती नाही. भूकंपाचे तपशील केंद्रबिंदू: हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यातील शिरळी / फुलदाभा परिस असून नोंदवलेले धक्के या प्रमाणे… मध्यरात्री १:३७ (४.६), २:१५ (३.६), २:१७ (३.९) आणि ३:२३ (४.१) प्रभावित क्षेत्र: हिंगोली, नांदेड आणि परभणी हे आहेत.
महाराष्ट्रातील मराठवाड्यातील हिंगोली, परभणी, नांदेड भागात मध्यरात्री १ वाजून ३७ मिनिटाला भूकंपाचे धक्के जाणवले. या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर ४.४ इतकी नोंदवण्यात आली आहे. हिंगोलीत शिंदे पांगरा गावाला सर्वात आधी भूकंपाचे धक्के जाणवले. भूकंपाच्या धक्क्यानंतर नागरिक झोपेतून दचकले. त्यानंतर नागरिकांनी सुरक्षित ठिकाणी धाव घेतली. भूकंपाच्या तीव्र धक्क्यांनी शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
हिंगोली- नांदेड- परभणी या भागात अनेक नागरिकांनी हा अनुभव घेतला. पहिला धक्का हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यातील पांग्रा शिंदे गावाच्या दक्षिणेकडे शिरळी या गावात याचे भूकंप केंद्र होते, यावेळेस भूकंप खोली १० किलोमीटर होती. तर दुसरे दोनही धक्के पांग्रा शिंदे गावाच्या पश्चिम- उत्तरेकडील काकडधाबा गावात यांचे केंद्र होते. यांची खोली १० किलोमीटर नोंदली गेली.
भूकंपाचे धक्के बसले तेव्हा बहुतांश जण झोपेत होते. एकापाठोपाठ एक असे दोन धक्के जाणवले असल्यामुळे सकाळपर्यंत अजून धक्के बसण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच भूकंपाची पूर्वकल्पना देणे शक्य नसल्यामुळे नागरिकांनी घाबरुन न जाता सतर्क रहावे. भूकंपाचे धक्के जाणवताच घराबाहेर पडून मोकळ्या जागेत जमावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
एकाच वेळी चार धक्के बसण्याची ही पहिलीच वेळ
हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ, कळमनुरी व वसमत तालुक्यात गेल्या सहा वर्षांत ३७ पेक्षा जास्त सौम्य भूकंपाच्या धक्क्यांची नोंद झाली आहे. आज मध्यरात्री ०१:३७ ते ०३:२३ या दोन तासांमध्ये चार सौम्य भूकंपाचे धक्के जाणवले. एकाच दिवशी चार धक्के बसण्याची ही पहिलीच वेळ आहे अशी माहिती ज्येष्ठ भूगर्भ शास्त्रज्ञ तथा छत्रपती संभाजीनगर येथील एमजीएम विज्ञान केंद्राचे संचालक डॉ. श्रीनिवासजी औंधकर यांनी दिली.


