भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

jalgaon

पंचायत समितीचा तांत्रिक सहाय्यक ३० हजारांची लाच घेताना जळगाव लाच लुचपत विभागाच्या जाळ्यात

जामनेर, जि. जळगाव. मंडे टु मंडे न्युज | विहिरीचे अनुदानासाठी ३० हजाराची लाच घेणारा जामनेर पं.स.मधील तांत्रिक सहाय्यक सागर अशोक नावकर हा जळगाव लाच लूचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकल्याने त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या संदर्भात अधिक माहिती अशी की, मुळ तक्रारदार यांची जामनेर शिवारात शेती असुन त्यावर गां.रा.ग्रा.रो.ह.यो. सन २०२१-२२ व २०२२-२३ या वर्षात पंचायत समीती, जामनेर यांचेकडुन प्रस्तावित सिंचन विहीर मंजुर झाली होती. जामनेर पंचायत समितीचे सागर नावकर, तांत्रिक सहाय्यक (कंत्राटी), पंचायत समिती, जामनेर यांनी प्रस्तावित विहिरीवर स्थळपाहणी करण्यापुर्वीच सागर नावकर यांनी तक्रारदार यांचेकडुन गावातील रोजगार सेवक यांचे मार्फत ३०,०००/- रूपये स्विकारून स्थळ पाहणी करून त्याचे फोटो काढुन नेले होते. त्यानंतर तकारदार यांना पंचायत समीती, जामनेर यांच्याकडून वेळोवेळी ६०,९६६/- रुपये एवढी रक्कम मिळाली होती. व उर्वरित रक्कम मिळण्यासाठी तक्रारदार यांनी तांत्रिक सहाय्यक सागर नावकर यांची भेट घेतली असता त्यांनी तक्रारदारास “तुम्ही विहीरीचे ठिकाण बदल केले आहे. त्यामुळे तुम्हाला पैसे मिळणार नाही. जर तुम्हाला विहीरीचे पुढील अनुदान (पैसे) पाहीजे असतील, तर तुम्हाला मला ३०,०००/ रुपये द्यावे लागतील” असे सांगुन लाचेची मागणी केली होती त्याबाबत तकारदार यांनी सागर नावकर यांचेविरूध्द दि.०६/०४/२०२६ रोजी ला.प्र.वि.जळगाव यांचेकडे तक्रार दिली होती.

तकारदार यांनी दिलेल्या तक्रारीचे अनुषंगाने दि.०६/०४/२०२६, दि.०९/०४/२०२६ व दि.१४/०५/२०२६ रोजी झालेल्या लाच मागणी पडताळणी कारवाई दरम्यान सागर नावकर, तांत्रिक सहाय्यक (कंत्राटी), पंचायत समिती, जामनेर, जि. जळगाव यांनी दि.०६/०४/२०२६ रोजी झालेल्या लाचमागणी पडताळणी कारवाईदरम्यान तकारदार यांना शासन योजनेअंतर्गत मंजुर सिंचन विहीरीचे काम करण्यासाठी पुढील अनुदान मिळवुन देण्याच्या मोबदल्यात पंचासमक्ष तक्रारदार यांना ३०,०००/- रुपयाची मागणी केल्याचे स्पष्ट झाल्याने सागर अशोक नावकर, तांत्रिक सहाय्यक (कंत्राटी), वय ३२ वर्ष, नेम पंचायत समिती कार्यालय, जामनेर, रा.गणपतीनगर, तळेगाव, ता.जामनेर,जि.जळगाव. यांचे विरूध्द जामनेर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्याचे कामकाज सुरू आहे.

सदरची कारवाई पर्यवेक्षण अधिकारी – योगेश ठाकुर, पोलीस उप अधिक्षक, ला.प्र.वि.,जळगांव. सापळा अधिकारी रेश्मा अवतारे,पोलीस निरीक्षक, ला.प्र.वि.,नंदुरबार, कॅम्प – जळगांव.सापळा पथक हेमंत नागरे,पोलीस निरीक्षक, पोउप निरी. सुरेश पाटील, पोकॉ/ राकेश दुसाने,पोकॉ/ प्रदिप पोळ, पोकॉ / भुषण पाटील, सर्व नेमला. प्र. वि. जळगांव तपास अधिकारी योगेश ठाकूर,पोलीस उप अधिक्षक, ला.प्र.वि.जळगांव यांनी केली.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!