शारीरिक स्वास्थ्य व मानसिक स्वास्थ्य सुदृढ ठेवले पाहिजे – जितेश गौरखेडे
ऐनपूर महाविद्यालयात स्वास्थ्य जागृती कार्यक्रम
ऐनपुर, ता. रावेर.मंडे टु मंडे न्युज प्रतिनिधी | ऐनपूर येथील सरदार वल्लभभाई पटेल कला व विज्ञान महाविद्यालय ऐनपूर येथे राष्ट्रीय सेवा योजना एकका अंतर्गत स्वास्थ्य जागृती कार्यक्रमाचे आयोजन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जे बी अंजने यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.
स्वास्थ्य जागृती कार्यक्रमाचे मुख्य मार्गदर्शक आयु. जितेश गौरखेडे हेल्थ कोच नागपूर यांनी विद्यार्थ्यांना व प्राध्यापकांना आपल्या शारीरिक स्वास्थ्य आणि मानसिक स्वास्थ्य विषयी जागृत राहिले पाहिजे, आपल्या जीवन जगण्याच्या शैलीमध्ये बदल केला पाहिजे तसेच आपली खानपान शैली बदलली पाहिजे तरच आपले शारीरिक स्वास्थ्य व मानसिक स्वास्थ्य नीट राहू शकते असे सांगितले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष संगणक विभागाचे समन्वयक प्रा एस. बी. महाजन यांनी अध्यक्षीय समारोप केला तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन प्रा. डॉ. व्ही. एन. रामटेके यांनी केले.
या कार्यक्रमाला महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेतील विद्यार्थी व सर्व प्राध्यापक व प्राध्यापकेतर कर्मचारी उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या आयोजनामध्ये प्रा. एस. पी. उमरीवाड, प्रा.एस.बी.महाजन,प्रा. डॉ.एस. बी. पाटील, प्रा.डॉ. एस. ए. पाटील, प्रा. डॉ.एन. यू.बारी, प्रा. डॉ. पी. आर गवळी, प्रा.एस.एस.साळुंके,प्रा. व्ही.एच. पाटील, प्रा. अक्षय महाजन, प्रा. प्रदीप तायडे, प्रा. ज्ञानेश्वर कोळी, श्रेयस पाटील, हर्षल पाटील, प्रणव पाटील यांचे सहकार्य लाभले. शेवटी कार्यक्रमाचे आभार एस.पी. उमरीवाड यांनी मानले. अध्यक्षांच्या परवानगीने कार्यक्रमाची सांगता केली.
