PM Kisan Yojana: पीएम किसान योजनेचा पुढील हप्ता तुम्हाला मिळणार की नाही? असे करा चेक
मुंबई, मंडे टू मंडे न्युज नेटवर्क : देशातील कोट्यवधी शेतकऱ्यांना आता प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या 23 व्या हप्त्याची प्रतीक्षा आहे. केंद्र सरकार लवकरच पात्र शेतकऱ्यांच्या बँक अकाउंटमध्ये 2 हजार रुपयांचा वेगळा हप्ता पाठवणार आहे. खरंतर यावेळीही अनेक शेतकऱ्यांचा हप्ता अडकू शकतो. असं होऊ द्यायचं नसेल तर त्यांना आवश्यक औपचारिकता पूर्ण करावी लागेल. अशावेळी शेतकऱ्यांचं नाव लाभार्थी यादीत आहे की नाही हे त्यांना चेक करावं लागेल. खालील कारणांमुळे तुमचा हप्ता अडकू शकतो.
पीएम किसान योजनेच्या सर्व लाभार्थ्यांना ई-केवायसी करणं अनिवार्य आहे. तुम्ही अद्याप ई-केवायसी प्रोसेस पूर्ण केली नसेल. तर लगेच पीएम किसान पोर्टलवर जाऊन किंवा जवळच्या सीएससी सेंटरच्या माध्यमातून ते पूर्ण करा.
जमीन पडताळणी: तुमच्या कृषी भूमिचा रेकॉर्ड तुमच्या अर्जाशी लिंक असणं गरजेचं आहे. तुमच्या स्टेटसमध्ये ‘Land Seeding’ समोर ‘No’ लिहिलेलं असेल तर तुम्हाला तुमचा हप्ता मिळणार नाही.
बँक अकाउंट आधारशी लिंक नसणे : सरकार डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून पैसे पाठवते. यासाठी तुमचं बँक अकाउंट तुमच्या सरकारी ओळखपत्राशी लिंक आणि डीबीटी इनेबल्ड असणं अनिवार्य आहे. तुम्हाला यंदाचा हप्ता मिळणार की नाही हे कसं चेक करायचं खाली पाहूया.
सर्वात आधी पीएम किसान योजनेच्या अधिकृत वेबसाइट(pmkisan.gov.in)वर जा. होमपेजवर उजव्या बाजूला दिलेल्या ‘Farmers Corner’ सेक्शनमध्ये जा आणि ‘Know Your Status’ ऑप्शनवर क्लिक करा. आता तुमच्यासमोर एक नवीन पेज ओपन होईल. येथे तुमचं रजिस्ट्रेशन नंबर नोंदवा.
स्क्रीनवर दिलेल्या कॅप्चा कोड भरा आणि ‘Get Data’ किंवा ‘Get OTP’ वर क्लिक करा. (तुमच्या रजिस्टर्ड मोबाईल नंबरवर एक ओटीपी येईल. तो टाका). यानंतर तुमचं पूर्ण बेनिफिशियरी स्टेटस स्क्रीनवर येईल. येथे लक्ष देऊन पाहा की, e-KYC, Eligibility आणि Land Seeding समोर ‘Yes’ लिहिलं आहे की नाही. तिन्हीच्या समोर ‘Yes’ लिहिलं असेल. तर तुम्हाला 23 वा हप्ता निश्चित मिळेल.
बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

