भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

महाराष्ट्रसामाजिक

गोड साखरेची कडू कहाणी ! ऐन सणासुदीत महागाईचा झटका : बजेट कोलमडले…

मुंबई. मंडे टु मंडे न्युज | ऐन सणासुदीचा काळ सुरू होण्यापूर्वीच संपूर्ण देशात महागाईमुळे सर्वसामान्यांचे किचन बजेट कोलमडले आहे. गेल्या १५ दिवसांत साखर १७ रुपयांनी महाग झाली असून किरकोळ बाजारात साखरेचे भाव पहिल्यांदाच ६५ ते ८०  रुपये प्रति किलोवर पोहोचले आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती भडकल्याने देशभरात गहू आणि कांद्याच्या किमतीने मोठी उसळी घेतली आहे.राज्यात साखर काही ठिकाणी ८० रुपये विकली जात असून इतरही ठिकाणी साखरेचे दर ८० रुपयांपर्यंत जाण्याचे सांगण्यात येते .

श्रावणातील धार्मिक कार्यक्रम, सण-समारंभ तसेच आगामी गणेशोत्सवामुळे साखर आणि गुळाची मागणी वाढली आहे. घरगुती वापराबरोबरच मिठाई, मोदक, लाडू आणि अन्य खाद्यपदार्थांच्या निर्मितीसाठी साखर व गुळाची मागणी वाढते. त्यामुळे मागणीच्या तुलनेत बाजारातील उपलब्धतेनुसार दरावर परिणाम होत असल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.साखरेच्या दरवाढीचा परिणाम मिठाई आणि खाद्यपदार्थांच्या दरावरही होण्याची शक्यता आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मागणी वाढल्यास किरकोळ बाजारातील दर आणखी वाढण्याची शक्यता ग्राहकांकडून व्यक्त होत आहे

मुंबई काही ठिकाणी 60 काही ठिकाणी 65 रुपये किलोने साखर

  • सांगली 80 रुपये किलो
    बुलढाणा– 80 रुपये किलो
    वाशिम– 80 रुपये किलो
    कोल्हापूर -75 रुपये किलो
    नाशिक 75 रुपये किलो
    पुणे 72 रूपये किलो
    परभणी 70 रुपये किलो
    सातारा 70 रुपये किलो
    पालघर- 70 रुपये किलो
    भंडारा – 70 रुपये किलो
    जळगाव 68 रुपये किलो
    अकोला- 65 रूपये किलो
    रत्नागिरी 62 रुपये किलो
    चंद्रपुर – 60 रुपये किलो
    नांदेड 65 रुपये किलो
    पालघर – 65 ते 70 रुपये प्रति किलो
    लातूर 70 रुपये किलो
    हिंगोली – 70 रुपये किलो
    वाशिम प्रति 78 ते 80 रु प्रति किलो
    नागपूर 68 ते 70 रु प्रति किलो
    बुलढाणा 78 रु ते 80 रु प्रति किलो
    गोंदिया 70 रु प्रति किलो
    भंडारा 68 रु प्रति किलो
    वर्धा 62 ते 64 रुपये प्रति किलो
    अकोला 65 रुपये प्रति किलो
    चंद्रपूर 60 प्रति किलो
    अमरावती 75 रु प्रति किलो
    यवतमाळ 75 ते 78 रु प्रति किलो
    गडचिरोली 60 रुपये प्रति किलो

पंधरा दिवसांपूर्वी साखर ४८ ते ५० रुपये प्रति किलो मिळत होती. परंतु ती आता ६५ रुपये किलोवर पोहोचली आहे. घाऊक बाजारातही साखरेने पहिल्यांदाच ६५ रुपयांचा टप्पा ओलांडला आहे. साखर कारखान्यांनी नफा वाढवण्यासाठी उसापासून साखर तयार करण्याऐवजी इथेनॉल निर्मितीला प्राधान्य दिले आहे. त्यामुळे साखरेच्या उत्पादनात ५ टक्के घट झाली आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!