भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

रावेरसामाजिक

सावदा येथे संतशिरोमणी श्री संतसेना महाराज पुण्यतिथी उत्साहात साजरी

सावदा, ता. रावेर. मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | नाभिक समाजाचे आराध्य दैवत संतशिरोमणी श्री संतसेना महाराज यांची पुण्यतिथी रावेर तालुक्यातील सावदा येथे मोठ्या श्रद्धा व भक्तिभावाने साजरी करण्यात आली. दिनांक २० ऑगस्ट बुधवार रोजी सकाळी ९ वाजता विठ्ठल मंदिरातून संतसेना महाराजांची पालखी मिरवणूक काढण्यात आली.

विठ्ठल मंदिर गांधी चौक येथून निघालेली पालखी मिरवणूक छत्रपती संभाजी महाराज चौक, मेन रोड मार्गे इंदिरा गांधी चौक, भगवान महावीर चौक, दुर्गा माता चौक, दुर्गा माता मंदिर मार्गे पालखी नगरपालिका संचालित डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक सभागृहात पोहोचली. नाभिक समाजाचे आराध्य दैवत संतशिरोमणी श्री संतसेना महाराज यांचे रविंद्र सापकर व ज्योती सापकर यांच्या हस्ते प्रतिमापूजन करण्यात आले .

या वेळी सावदा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल पाटील, माजी नगरसेविका रेखा वानखेडे, माजी नगराध्यक्ष राजेंद्र चौधरी, माजी नगरसेवक भानुदास भारंबे, श्याम पाटील, अजय भारंबे,गजानन ठोसरे, सिमरन वानखेडे आदी मान्यवर उपस्थित होते.

” नाभिक समाज हा शांत असून एकोप्याने राहणे हेच या समाजाचे मोठे भाग्य आहे. समाजातील तरुणांनी व्यसनांपासून दूर राहावे, हेच संतांचे खरे मार्गदर्शन असल्याचे
सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल पाटील यांनी या वेळी बोलताना सांगितले. तसेच माजी नगराध्यक्ष राजेंद्र चौधरी यांनी “संत सेना महाराज व विठ्ठल भगवान यांचे जसे प्रेम होते तसेच आपणही भगवंताच्या पायी वारीत समाविष्ट होऊन प्रत्येक महिन्याच्या एकादशीला सावदा येथील विठ्ठल मंदिरात उपस्थित राहावे.” असे सांगितले.

सिमरन वानखेडे यांनी त्यांनी वाचन केलेल्या ग्रंथातील महत्त्वाचे मुद्दे मांडत, “आपणही संतांच्या आचरणाचा अवलंब करून योग्य मार्ग निवडावा, हेच संतशिरोमणींचे खरे कार्य आहे,” असे सांगितले. सदर कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणावर समाज बांधव उपस्थित होते.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!