तापी नदी पात्रात महिलेचे हातपाय बांधलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह, घातपाताचा संशय
निंभोरा सीम, ता. रावेर. मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | रावेर तालुक्यातील निंभोरा सीम येथे तापीनदीपात्रात हातपाय बांधलेल्या अवस्थेत एका महिलेचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत दिनाक दि. २४ जुलै गुरुवार रोजी सकाळी ७ वाजेच्या सुमारास आढळून आला. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. मृतदेह हातपाय बांधलेल्या अवस्थेत आढळून आल्याने घातपात तर झाला नाही ना? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
रावेर तालुक्यातील निभोरा सीम येथील पोलीस पाटील यांना तापी नदी पात्रात एका महिलेचा मृतदेह असल्याची माहिती नागरिकांनी दिली. त्यांनी तत्काळ निंभोरा पोलिसाना या बाबत माहिती दिली. निंभोरा एपीआय हरिदास बोचरे यांनी तत्काळ टीमसह घटनास्थळी धाव घेत ग्रामस्थांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढण्यात आला.
पिंपरी नांदूच्या शिवारातील नदी मृतदेह अनोळखी महिलाचा असून या महिलेचे वय ३० ते ३५ वर्षांचे आहे. या महिलेने लाल गुलाबी रंगाचा पंजाबी कुर्ता व लाल गुलाबी रंगाची लेगीज परिधान केलेली आ हे. तर गळ्याभोवती पांढरा रंगाची ओढणी गुंडाळलेली होती. या महिलेचे डोळे व जीभ बाहेर आली आहे. या महिलेचे उजव्या हाताच्या मनगटाजवळ व दोन्ही पाय दोरीने बांधलेले होते. तर दोरीचा एक भाग खुणा काठावर मृतदेह आणला. हा दर्शवण्याकरता लावण्यात येणाऱ्या सिमेंटच्या खांबाला बांधल्याचे दिसून आले. हा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आहे.
सदर महिलेचा मृतदेह हा हात पाय बांधलेल्या अवस्थेत व कुजलेल्या अवस्थेत मिळून आल्याने तत्काळ वैद्यकीय पथक व मोबाईल फॉरेन्सिक पथक घटनास्थळी बोलाविण्यात येऊन जागीच पंचनामा करून शवविच्छेदन करण्यात आले.त्यानंतर मृतदेह पोलिसांनी रीतसर दफन केला.
महिलेचे हात व पाय बांधलेल्या अवस्थेत मृतदेह कुजलेला आढळून आल्याने घातपात असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत असून या बाबत पोलीस सर्वबाजूने तपास करत असून सदर महिलेची ओळख पटविण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

