भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

राजकीयरावेर

सावदा नगराध्यक्ष निवडणुकीसाठी युवा चेहरा रिंगणात, सौ. संजना यश भैरवा नगराध्यक्ष पदासाठी मैदानात !

सावदा, ता. रावेर. मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | सावद्याच्या राजकारणातून एक नवीन बातमी समोर येत असून नगराध्यक्षपदासाठी एक नवीन चेहरा उमेदवारी करीत आहे. सावदा नगराध्यक्षा पद एससी महिलांसाठी राखीव असून राजकीय वातावरण तापायला सुरुवात झाली आहे. नगरपालिकां निवडणुकीच बिगुल केव्हाही वाजू शकतं. अशातच मेहतर-वाल्मीकि समाजातील यश चंद्रशेखर भैरवा यांच्या पत्नी सौ. संजना भैरवा या युवा चेहऱ्याने नगराध्यक्षपदासाठी निवडणुकीच्या मैदानात एंट्री केली आहे.

कोण आहेत सौ. संजना यश भैरवा
सौ. संजना यश भैरवा या स्वर्गीय मोतीजी भैरवा (नानासाहेब विष्णू हरी पाटील कन्या शाळेतील सीनियर क्लर्क) यांचे नातू यश चंद्रशेखर भैरवा यांच्या पत्नी सौ. संजना यश भैरवा यांनी सुद्धा आपली नगराध्यक्षपदासाठी उमेदवारीची इच्छा जाहीर केली आहे. एससी महिलांसाठी राखीव असलेल्या या पदासाठी त्यांची ही उमेदवारी समाजात उत्साहपूर्ण वातावरण निर्माण करणारी ठरणार असल्याचे बोलले जात आहे. सौ. संजना यश भैरवा यांच्या उमेदवारीने समर्थकांमध्ये आनंदाची लहर उसळली आहे.

“आमच्या हक्काचा उमेदवार निवडून येईल, ही खात्री आहे,” असा विश्वास त्यांच्या समर्थकांनी व्यक्त केला. संवाद साधताना यश भैरवा यांनी सांगितले. “नागरिकांचा मिळालेला प्रेमळ प्रतिसाद आणि विश्वास हाच आमच्या निर्णयाचा पाया आहे. आमची उमेदवारी जाहीर करण्यामागे सर्वसामान्यांच्या समस्या सोडवणे हेच मुख्य ध्येय आहे. शहराच्या विकासासाठी आणि सामाजिक न्यायासाठी आम्ही निश्चयाने कार्य करू.” त्यात विशेष बाब नमूद केली की, मोठ्या राजकीय नेत्यांच्या संपर्कात असल्यामुळे त्यांच्या पत्नीना उमेदवारीचा निर्णय घेण्यात आला.

वैयक्तिक जनतेशी असलेला स्नेहाचा संबंध, व्यक्तिमत्त्व आणि लोकांशी असलेला सातत्यपूर्ण संपर्काच्या जोरावर आपण ही निवडणूक लढविणार असल्याचे ‘’मंडे टु मंडे न्युज’’ शी बोलताना भैरवा यांनी सांगितले. नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी जाहीर करताच सौ . संजना भैरवा यांना सर्व स्तरातून पाठिंबा मिळत आहे. सध्या त्या कोणत्या राजकीय पक्षाच्या वतीने उमेदवारी दाखल करणार की अपक्ष म्हणून निवडणूक लढवणार, याबाबत अधिकृत घोषणा झालेली नाही. मात्र, त्या लवकरच उमेदवारीसाठी पक्ष प्रवेश करणार असून, त्यांना उमेदवारी साठी राजकीय पक्षाकडूनही ऑफर आल्याचे सांगण्यात आले असून, आता त्या अपक्ष निवडणूक लढविणार की पक्षाकडून उमेदवारी करणार? हे पाहणं महत्वाच आहे. संजना भैरवा यांच्या निवडणुकीने निवडणूक अधिक रंगतदार होणार हे मात्र नक्की.

सावदा नगरपरिषद निवडणुकीच्या तयारीत विविध समाजघटक आपल्या रणनीती आखत मैदानात उतरण्यास सज्ज झाले असून, संजना यश भैरवा यांच्या उमेदवारीने लढतीला नवा आयाम मिळाला असून, येत्या काळात त्या कोणत्या रणनीतीने निवडणूक लढवतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!