भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईमरावेर

सावदा येथील जुगार अड्ड्यावर बंदूकधाऱ्यांकडून दरोडा,बंदुकीचा धाक दाखवत लाखोंची लूट

सावदा,ता.रावेर,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। रावेर तालुक्यातील सावदा शहरातील एका जुगार अड्ड्यावर दहा ते बारा बंदूकधारी दरोडेखोरांनी बंदुकीचा धाक दाखवत ५० ते ६० हजाराच्या रोख रक्कमेसह ६० ते ७० हजार रुपये किमतीचे सहा मोबाईल ची लूट करून दरोडा टाकला.

रावेर तालुक्यातील सावदा येथील, सावदा – रावेर रोडवर सुरू असलेल्या जुगार अड्ड्याच्या क्लब वर रात्री नऊ वाजेच्या सुमारास मध्यप्रदेशातील बऱ्हाणपूर येथील सुमारे दहा ते बारा लोक दोन स्कूटी वर ट्रिपल सीट अँपे रिक्षा पूर्ण भरून आले होते. यातील एका स्कुटी वरील तीन लोक हे बंदूक घेऊन थेट सुरू असलेल्या जुगार अड्ड्याच्या क्लबवर जाऊन तिथे असलेल्या लोकांच्या कानफाटावर बंदू लावत लूट केली . यातील एका स्कूटी वरील तीन व अपे रिक्षातील हे रावेर रोडवरच एका भागात उभे होते. हे सर्व दरोडेखोर सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहेत.

या लुटीत जुगार खेळणाऱ्यां एका व्यक्तीच्या पायाला झटापटीत दुखापत देखील झाली असून याबाबत कोणीही तक्रार दिली गेली नाही, माध्यप्रदेशातून दरोडेखोर दरोडा टाकण्यासाठी इतक्या लांब सावद्या पर्यंत येण्याचं धाळस दरोडेखोर करतात तेही जुगार अड्ड्यावर, म्हणजे मुळातच जुगार अड्डा अवैध त्यात तक्रार कोणकरणार? बोंबाबोंब कोण करणार?

या पूर्वी असाच सेम प्रकार महाराष्ट्र -मध्यप्रदेश सीमेवर रावेर तालुक्यातिलच चोरवड येथे अशाच प्रकारे बऱ्हाणपूर येथून आलेल्या बंदूकधारी दरोडेखोरांनी चोरवड येथे अवैध सुरू असलेल्या ‘ नागोली ‘ नदी जवळील जुगार अड्ड्यावर जुगार खेळणाऱ्यांवर बंदूक रोखून दरोडा टाकला होता. व लाखो रुपयांची लूट केली होती .हे तेच दरोडेखोर तर नाहीं ना? हा असाच प्रयोग त्यांनीच सावदा येथील जुगार अड्ड्यावर केला असावा?

गेल्या काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी चे नेते माजी मंत्री आ.एकनाथराव खडसे यांनी विधानपरिषदेत सावद्या सह रावेर- यावल तालुक्यात सट्टा पत्या सह अवैध धंदे सुसाट सुरू असल्याचा जाहीर आरोप केला होता ,तसेच या बाबत तक्रार केली असता कार्यवाही न होता उलट हफ्ते वाढविले जातात असा गौप्यस्फोटही केला होता, त्या वेळी काही काळा साठी अवैध धंद तात्पुरते बंद करण्यात आले होते तर काही छुपे जागा बदलून सुरूच होते.या बद्दल प्रशासनाला सर्वकाही माहिती असतं!

दरम्यान दरोडेखोरांनी हिसकावलेले मोबाईल त्यांनी दोन दिवसानंतर परत देखील केल्याची चर्चा असून हे खरे असेल तर ते कोणाच्या माध्यस्तीने परत केले ? दरोडेखोरांशी मध्यस्थी करणारे हे महाभाग कोण? एव्हढे होऊनही या प्रकारा बाबत पोलिसप्रशासन अनभिग्न कसे?

जुगार अड्ड्यावर पडलेल्या दरोड्या मुळे सावदा व परिसरात जुगार अड्ड्यांसह इतर अवैध धंदे राजरोसपणे सुरू असल्याचे समोर आले असून येत्या काळात आ. एकनाथराव खडसे हा विषयपुन्हा विधानपरिषदेत काढतात का? हे पहाणे महत्वाचे ठरेल .

तसेच जुगार अड्ड्यावर पडलेल्या दरोड्यामुळे या भागात अवैध धंदे सुरू असल्याचे उघड झाल्यामुळे पोलिसांची भूमिका काय? अवैध धंदे बंद होतात का? व झाले तर किती दिवस बंद होतील ? का ठिकाण बदलून दुसरीकडे छुपे सुरूच राहातील, हे येणारा काळच सांगेल.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!