सावदा हायस्कूलचा बारावी विज्ञान चा निकाल 100 टक्के
सावदा,ता.रावेर,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। मार्च 2022 मध्ये झालेल्या बारावीच्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षेचा निकाल आज बुधवार रोजी ऑनलाइन पद्धतीने जाहीर करण्यात आला यात सावदा नगरपालिका संचलित आनंदीबाई गंभीरराव हायस्कूल व नामदेवराव गोमाजी पाटील कनिष्ठ महाविद्यालय सावदा,च्या 12 वी विज्ञान शाखे मध्ये 116 पैकी 116 विद्यार्थी उत्तीर्ण होऊन 100 टक्के निकाल लागला,12 वी विज्ञान मध्ये बेंडाळे गार्गी रेवानंद ही 528 गुण (88%) मिळवून प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाली, सोनवणे हर्षदा संजय हिने 515 गुण (85.33%)मिळवून द्वितीय क्रमांकाने उत्तीर्ण झाली.
- मुक्ताईनगर मध्ये लक्षवेधी लढतीत पुन्हा महायुतीचे चंद्रकांत पाटील विजयी, रोहिणी खडसे पराभूत
- रावेर मधून महायुतीचे अमोल जावळे ४३ हजारांच्या वर मतांनी विजयी
- मोठी ब्रेकिंग : रावेर मधून अमोल जावळे पाच हजाराने पुढे
- ब्रेकिंग : ३० हजारांची लाच घेताना राज्य उत्पादन शुल्क विभागाचा उप निरीक्षक जाळ्यात, फैजपूर मध्ये गुन्हा दाखल
- मुक्ताईनगर ची लढत लक्ष्यवेधी, पूर्वीच्याच प्रतिस्पर्ध्यांमध्येच मुख्य लढत..कोण जिंकणार..
तसेच 12 वी कला शाखेत 122 पैकी 116 विद्यार्थी पास झाले असून कला शाखेचा 95.08 टक्के निकाल लागला असून यात चौधरी जयश्री सोपान हिने 496 गुण (82.67) मिळवून प्रथम क्रमांक पटकावला तर भोई पूजा प्रकाश हिने 470 गुण (78.33)मिळवून द्वितीय क्रमांक पटकावला. एकूण 238 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली त्या पैकी 232 विद्यार्थी पास झाले, असा एकूण 97.47 टक्के निकाल लागला असून त्याचे प्रशासन अधिकारी कैलास कडलक, मुख्याधिकारी किशोर चव्हाण,मुख्याध्यापक सी सी सपकाळे,पर्यवेक्षक जे व्ही तायडे व सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनदन केले.