भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

प्रशासनरावेर

सावदा नगरपरिषद प्रशासनात बदलाचे वारे; प्रशासक काळातील कारभार, वाढत्या तक्रारी आणि चौकशीच्या मागण्यांनंतर मुख्याधिकाऱ्यांकडून बदलीच्या हालचालीं ?

सावदा, मंडे टू मंडे न्युज चमू | सावदा नगरपरिषदेतील कारभारावर गेल्या काही महिन्यांपासून विविध स्तरांतून टीकेची झोड उठत असतानाच आता नगरपरिषदेच्या प्रशासकीय वर्तुळात सध्या एका मोठ्या बदलाची कुजबूज सुरू झाली असून, नगरपरिषदेतील विद्यमान मुख्याधिकाऱ्यांनी बदलीसाठी जोरदार प्रयत्न सुरू केल्याची खात्रीलायक माहिती जिल्हा प्रशासनातील सूत्रांकडून मिळाली आहे. गेल्या काही महिन्यांपासून नगरपरिषदेच्या कारभारावर होत असलेली तीव्र टीका, विकास कामांच्या वाटपातील कथित अनियमितता, ऑफलाईन पद्धतीने मंजूर करण्यात आलेली कामे आणि प्रशासक काळातील निर्णयांवर उपस्थित झालेले गंभीर प्रश्न यामुळे प्रशासनाची चांगलीच कोंडी झाली आहे.

प्रशासक काळात विकास कामांच्या वाटपात नियमबाह्य पद्धतीचा अवलंब झाल्याचे आरोप, ठेके वाटप प्रक्रियेतील पारदर्शकतेवरही संशय व्यक्त केला जात आहे. मर्जितल्याना ठेके मंजूर केल्याच्या तक्रारी, तसेच प्रशासक काळातील अनेक निर्णयांबाबत उपस्थित झालेले प्रश्न यामुळे नगरपरिषदेची प्रतिमा आधीच वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे.

याच पार्श्वभूमीवर नगरपरिषदेतील विद्यमान मुख्याधिकाऱ्यांनी बदलीसाठी प्रयत्न सुरू केल्याची माहिती प्रशासनातील विश्वासार्ह सूत्रांकडून मिळत आहे. जळगाव जिल्हा प्रशासनातील काही सूत्रांच्या माहितीनुसार, बदलीसाठी विविध स्तरांवर हालचाली सुरू असून त्यासाठी “फिल्डिंग” लावण्यात आल्याची चर्चा प्रशासकीय वर्तुळात सुरू आहे.

विशेष म्हणजे, सावदा नगरपरिषदेतील विकास कामांच्या मंजुरीपासून ते ठेके वाटपापर्यंतच्या अनेक निर्णयांवर सातत्याने प्रश्न उपस्थित केले जात आहेत. माहिती अधिकारातून समोर आलेली कागदपत्रे, वाढत्या तक्रारी आणि स्थानिक पातळीवर व्यक्त होत असलेली नाराजी यामुळे प्रशासनावरील दबाव वाढत असल्याचे चित्र आहे.

दरम्यान, नगरपरिषदेत गेल्या काही काळात झालेल्या कामकाजाची चौकशी व्हावी, तसेच प्रशासक काळातील निर्णयांची स्वतंत्र पडताळणी व्हावी, अशी मागणीही विविध स्तरांतून होत आहे. अशा परिस्थितीत मुख्याधिकाऱ्यांच्या संभाव्य बदलीच्या चर्चांनी अधिकच जोर धरला असून, अशा वातावरणात मुख्याधिकाऱ्यांच्या संभाव्य बदलीच्या चर्चांनी अधिकच वेग घेतला असून, ही बदली वाढत्या वादातून सुटका करून घेण्याचा प्रयत्न असल्याचे याबाबतही विविध तर्क-वितर्क लावले जात आहेत.

“तक्रारींचा भडिमार, माहिती अधिकारातून उघड होणारी कागदपत्रे, वाढते आरोप आणि आता बदलीच्या हालचाली… आगामी काळात या घडामोडींना कोणते वळण मिळते आणि नगरपरिषदेतील कथित अनियमिततेबाबत कोणते निर्णय घेतले जातात ? सावदा नगरपरिषदेतील घडामोडी केवळ प्रशासकीय नसून येणाऱ्या काळात अनेक गोप्य स्पोटांची मोठ्या वादळाची नांदी ठरणार आहे”

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!