गर्भवती महिलेचा सातपुड्याच्या अतिदुर्गम भागात संशयास्पद मृतदेह आढळल्याने खळबळ
रावेर, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | सातपुड्याच्या अतिदुर्गम भागात असलेल्या जंगलात आठ महिन्यांच्या गर्भवती महिलेचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे.
सातपुड्याच्या जंगलातील दुर्गम भागात असलेल्या निमड्या येथील नवीन नवाड पाड्यावर आठ महिन्यांची गर्भवती विवाहितेचा मृतदेह डोंगरदरीत संशयास्पद स्थितीत आढळून आला. लालूबाई शरद पावरा ही महिला ४ एप्रिल रोजी बेपत्ता झाली होती .मात्र त्याच्या दुसऱ्याच दिवशी तिचा गळा आवळलेल्या अवस्थेतील मृतदेह झाडाला साडीने अडकवलेला आढळून आला.
यासंदर्भात पोलिसांनी माहिती मिळताच पोलीस पथकाने घटनास्थळी धावघेत पंचनामा करून मृतदेह रावेर ग्रामीण रुग्णालयात आणला.मात्र डॉक्टरांच्या अभावामुळे शवविच्छेदनासाठी जळगाव शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात हलविण्यात आला.ही महिला चौथ्यांदा गर्भवती होती.मृत महिलेच्या पश्चात तीन मुले असून त्या महिलेने आत्महत्या केली की तिचा खून करण्यात आला या बद्दल अद्याप कुठलीही माहिती समोर आलेली नसली तरी याबाबत संशय व्यक्त केला जात असून पोलिस पुढील तपास करीत आहेत.

