भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

महाराष्ट्रशैक्षणिक

राज्यात पट पडताळणी, संस्था चालकांचे धाबे दणाणले, बोगसगिरी होणार उघड

मुंबई, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क |राज्याच्या शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांमधील विद्यार्थ्यांची एकाचवेळी पटपडताळणी करण्याचा निर्णसाय शिक्षण विभागाने घेतला असून शनिवार (दि. ११) पासून त्याची सुरुवात होणार आहे. विशेष म्हणजे शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांच्या परीक्षांच्या महत्वाच्या विषयाच्या पेपरच्या दिवशी ही पटपडताळणी होणार आहे. यामुळे संस्था चालकांचे धाबे दणाणले आहेत. आजही अनेक शाळांमध्ये विद्यार्थी संख्येचे आकडे फुगविलेले आहेत. जर एकाच दिवशी ही पडताळणी झाली तर अनेक ठिकाणची बोगसगिरी समोर येणार आहे.

राज्यात यापूर्वी काही वर्षापूर्वी व्यापक स्वरूपात पटपडताळणी मोहीम हेतूने घेण्यात आली होती, त्यात मोठ्या प्रमाणावर विद्यार्थी बोगस असल्याचे समोर आले होते. आता मागच्या वर्षी त्याच संदभनि पुन्हा एकदा एकाचवेळी पटपडताळणी करण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला होता. त्यानुसार आता राज्यभरात ११, १५ आणि २२ एप्रिल रोजी पहिली ते आठवी तसेच ९ वी आणि ११ वी ची पटपडताळणी करण्याचे आदेश शिक्षण उपसंचालकांनी दिले आहेत. ही पटपडताळणी परीक्षेच्या दिवशीच व्हावी यासाठी ९ वी आणि ११ बी च्या मराठी, गणित आणि इंग्रजी विषयांची परीक्षा या तीन तारखांना ठेवावी असे स्पष्ट आदेश शिक्षण विभागाने सर्व शाळांना दिले आहेत. तसेच या व्यापक पटपडताळणीसाठी पुरेशा स्वरूपात मनुष्यबळ उपलब्ध करून देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. यामुळे आता पटसंख्येच्या बाबतीत बोगसगिरी करणाऱ्या संस्था चालकांचे धाबे दणाणले आहे.

मुख्याध्यापक संयुक्त महामंडळाचा विरोधी सूर

एकीकडे अशा प्रकारच्या व्यापक पटपडताळणीमधून शिक्षण क्षेत्रातील बोगसगिरी समोर येणार असताना अशा उपक्रमांचे स्वागत करण्याऐकजी अखिल महाराष्ट्र माध्यनिक व उच्च माध्यमाइक शाळा मुख्याध्यापक संयुक्त महामंडळाने मात्र सदरची पटपडताळणी रद्द करण्याची मागणी केली आहे. शाळांचे परीक्षांचे नियोजन बिपडेल आणि त्याचा परिणाम निकाल तयार करण्याच्या कामावर होईल असले कारण वासाठी पुढे करण्यात आले आहे. त्यामुळे हे महामंडळ संस्था चालकांची ढाल बनू पाहत आहे का असा प्रश्न उपस्थित होत आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!