भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

मुक्ताईनगर

मुक्ताईनगर नगरपंचायतीच्या पाणीपुरवठा विभागाचा भोंगळ कारभार : कर्मचाऱ्यांकडून फोनला प्रतिसाद नाही; नागरिकांमध्ये तीव्र नाराजी

मुक्ताईनगर. मंडे टु मंडे न्युज. अक्षय काठोके | ऐन पावसाळ्याच्या काळात नागरिकांना विविध पाणीपुरवठा समस्यांना सामोरे जावे लागत असताना मुक्ताईनगर नगरपंचायतीच्या पाणीपुरवठा विभागाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करणाऱ्या नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असल्याची तक्रार समोर येत आहे. विभागातील संबंधित कर्मचाऱ्यांकडून फोन उचलला जात नसल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.

नागरिकांच्या म्हणण्यानुसार, पाणीपुरवठा खंडित होणे, कमी दाबाने पाणी येणे, गळती किंवा इतर तांत्रिक अडचणींबाबत माहिती देण्यासाठी अनेक वेळा संपर्क साधूनही फोनला प्रतिसाद मिळत नाही. त्यामुळे समस्या वेळेत मांडता येत नसल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे.

नगरपंचायतीने नागरिकांच्या तक्रारींना तातडीने प्रतिसाद मिळावा यासाठी पाणीपुरवठा विभागातील संपर्क व्यवस्था अधिक सक्षम करावी, संबंधित कर्मचाऱ्यांनी कार्यालयीन वेळेत नागरिकांचे फोन तत्परतेने स्वीकारावेत आणि तक्रारींचे त्वरित निराकरण करावे, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

याबाबत नगरपंचायत प्रशासनाने योग्य दखल घेऊन नागरिकांना प्रभावी सेवा उपलब्ध करून द्यावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!