महाराष्ट्र हादरला! आमचं बाळ आम्हाला परत द्या… पालकांचा हृदयद्रवक आक्रोश
मंडे टु मंडे न्युज | अमरावतीच्या जिल्हा स्त्री रुग्णालयाच्या (डफरिन रुग्णालय) नवजात शिशू अतिदक्षता विभागात (NICU) २४ ऑगस्ट २०२६ रोजी पहाटे ३:३० वाजता व्हेंटिलेटरमध्ये झालेल्या स्फोटामुळे भीषण आग लागली. या दुर्घटनेत ३ नवजात बालकांचा जागीच मृत्यू झाला असून, अन्य ६ बालकांना सुरक्षित बाहेर काढून पुढील उपचारासाठी सुपर स्पेशालिटी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
पहाटेच्या सुमारास तिसऱ्या मजल्यावर असलेल्या एनआयसीयू (NICU) युनिटमधील व्हेंटिलेटर युनिटमध्ये अचानक स्फोट झाला आणि आग पसरली.या वॉर्डमध्ये एकूण ९ नवजात बाले उपचार घेत होती. हॉस्पिटलच्या सतर्क कर्मचाऱ्यांनी तातडीने धाव घेऊन ३९ पैकी ३६ बालकांना सुरक्षित बाहेर काढले.धूर आणि गुदमरल्यामुळे तीन बालकांचा जीव गेला, तर ६ बालकांना तातडीने [सुपर स्पेशालिटी रुग्णालयात हलवण्यात आले.
अमरावती येथील जिल्हा स्त्री रुग्णालयाच्या (डफरिन रुग्णालय) नवीन इमारतीतील नवजात शिशू अतिदक्षता विभागात (SNCU/NICU) सोमवारी (दि.२४) पहाटेच्या सुमारास अचानक भीषण आग लागली. या दुर्दैवी घटनेत धुरामुळे गुदमरून आणि होरपळून ३ नवजात बालकांचा अत्यंत वेदनादायक मृत्यू झाला. तर दुसरीकडे, आगीचे तांडव आणि धुराचे लोट पसरले असताना रुग्णालयातील डॉक्टर, परिचारिका व कर्मचाऱ्यांनी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता ३६ नवजात बालकांना सुरक्षितपणे बाहेर काढून त्यांचे प्राण वाचवले आहेत.
मिळालेल्या अधिक प्राथमिक माहितीनुसार, रुग्णालयाच्या तिसऱ्या मजल्यावर असलेल्या ‘एसएनसीयू’ विभागात व्हेंटिलेटर मध्ये शॉर्टसर्किट होऊन अचानक स्फोट झाला. स्फोटानंतर संपूर्ण कक्षात वेगाने आग पसरली आणि दाट धुराचे लोळ निघू लागले.जिल्हा स्त्री रुग्णालयातील नवजात शिशू अतिदक्षता विभागात एकूण तीन कक्ष असून, या कक्षांमध्ये ३९ बालकांवर उपचार करण्याची क्षमता आहे. घटनेच्या वेळी या विभागात एकूण ३९ मुले उपचारासाठी दाखल होती. ज्या कक्षात आग लागली, तेथे १२ नवजात बालके उपचार घेत होती.
कर्मचाऱ्यांच्या या तत्परतेमुळे ३६ बालकांचे प्राण वाचविण्यात यश:
आग लागल्याचे समजताच आणि धुराचे लोट दिसताच ऑन-ड्यूटी असलेल्या डॉक्टर, नर्सेस आणि आरोग्य कर्मचाऱ्यांनी एकच धावपळ करत रेस्क्यू ऑपरेशन सुरू केले. धुरामुळे श्वास घेणे कठीण झाले असतानाही कर्मचाऱ्यांनी जीवाची बाजी लावून बालकांना एकामागोमाग एक बाहेर काढले.
पालकांचा हृदयद्रावक आक्रोश:
घटनेची बातमी वाऱ्यासारखी पसरताच रुग्णालयाच्या परिसरात पालकांनी आणि नातेवाईकांनी मोठी गर्दी केली. “आमचे बाळ आम्हाला परत द्या!” असा आक्रोश करत अनेक माता आणि पालकांनी रुग्णालयाबाहेर हंबरडा फोडला. आपल्या चिमुकल्यांच्या सुरक्षिततेबाबत काहीच माहिती मिळत नसल्याने पालकांची प्रचंड धावपळ झाली व वातावरण अत्यंत शोकाकुल झाले होते.
यामुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले आहेत.प्रत्येक मृताच्या कुटुंबीयांना ५ लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर करण्यात आली आहे.आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी घटनास्थळाला भेट देऊन पाहणी केली आणि दोषींवर कठोर कारवाई करण्याचे आश्वासन दिले.
बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

