सावद्यात शिवसेना बैठकीचा ‘राडा’; खुर्चीच्या वादातून हाणामारी, परस्पर आरोप-प्रत्यारोपांनंतर नगरसेवक, नगरसेवक पतींसह दोन्ही गटांवर गुन्हे !
सावदा ता. रावेर, मंडे टू मंडे न्युज नेटवर्क | सावदा येथील शासकीय विश्रामगृहात ११ जुलै शनिवारी रोजी झालेली शिवसेनेच्या बीएलए (बूथस्तरीय कार्यकर्ते) पदाधिकाऱ्यांची बैठकीदरम्यान खुर्चीवर बसण्याच्या कारणावरून सुरू झालेला वाद काही क्षणांतच धक्काबुक्की, शिवीगाळ आणि मारहाणीपर्यंत पोहोचल्याचा आरोप दोन्ही बाजूंनी करण्यात आला आहे. या घटनेनंतर परस्परविरोधी फिर्यादी दाखल झाल्याने सावदा पोलिसांनी दोन्ही बाजूंविरुद्ध स्वतंत्र गुन्हे नोंदवून तपास सुरू केला आहे.
सावदा येथील मदिना नगर मधिल रहिवासी मोईनखान मोहसिनखान यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, बीएलओ बैठकीसाठी संबंधित मी व माझे काका सुहिल खान शासकीय विश्रामगृहात उपस्थित होते. बैठक सुरू असताना मी खुर्चीवर बसलो असताना मनीष भंगाळे याने मला खुर्ची बदलण्यास सांगितले. यावरून दोघांमध्ये शाब्दिक वाद झाला. त्यानंतर मनीष भंगाळे याने मला चापट मारून बाहेर येण्याची धमकी दिली. दिल्याचा आरोप आहे. यानंतर विश्रामगृहाबाहेर मनीष भंगाळे याने सचिन बन्हाटे व गणेश माळी यांना घटनास्थळी बोलावून घेतल्याचा आरोप फिर्यादीचा आहे. तिघांनी मिळून पुन्हा वाद घालत फिर्यादी मोईनखानवर हल्ला केला. यावेळी सचिन बन्हाटे यानी लोखंडी दांड्याच्या फावड्याने डोक्यावर वार केला. बचाव करताना तो वार डाव्या डोळ्याच्या वर कपाळावर लागल्याने गंभीर दुखापत होऊन रक्तस्राव झाल्याचा त्यानंतर मनीष भंगाळे याने तोच फावडा घेऊन डाव्या हातावर मारहाण केल्याचा आरोप फिर्यादीत आहे. तसेच गणेश माळी याने चापटा-बुक्क्यांनी मारहाण करून शिवीगाळ करत जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. फिर्यादी मोईनखान प्राथमिक उपचारादरम्यान कपाळावरील जखमेवर आठ टाके घालण्यात आल्याचे नमूद असून या प्रकरणी मोईनखान फिर्यादीवरून सावदा पोलिसांनी तिघंविरुद्ध गुन्हा दाखल केला असून युवासेना प्रमुख मनीष यशवंत भंगाळे, भाजप नगरसेवक सचिन चुडामण बन्हाटे आणि गणेश राजू माळी यांच्या नावांचा समावेश आहे.
तर दुसरीकडे या घटनेप्रकरणी मनीष यशवंत भंगाळे त्यांच्या स्वतंत्र तक्रारीनुसार, बीएलओ बैठकीसाठी गेलो असता मोईनखान खान याने सरक खुर्ची वरून असा बोलल्याने मी पक्षाचा पदाधिकारी आहे व्यवस्थित बोल सांगितले याचा राग आल्याने मोईनखान मोहसिनखान याने खुर्चीवरून झालेल्या वादानंतर मोईनखान मोहसिनखान यांने कॉलर पकडून मारहाण केली तसेच वाहनाच्या चावीला असलेल्या धारदार वस्तूने डाव्या खांद्यावर व कानामागे वार केला. त्यानंतर बाहेर झालेल्या वादात सूरज उर्फ बद्री संतोष परदेशी यांनी सचिन बन्हाटे यांना उद्देशून तुझा काय संबंध तू इथे कसा काय आला असे बोलून मोईनखान यांच्या हातातील लाकडी दांड्याने सचिन बन्हाटे यांच्या छातीवर मारहाण केल्याचा, तर मोईनखान यांनी धारदार वस्तूने त्यांच्या डाव्या हातावर वार केल्याचाही आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे. या मनिष भंगाळे यांच्या तक्रारीवरून सावदा पोलिसांनी मोईनखान मोहसिनखान आणि शिवसेना शहरप्रमुख तथा स्वीकृत नगरसेवक सूरज उर्फ बद्री संतोष परदेशी यांच्याविरुद्धही स्वतंत्र गुन्हा दाखल केला आहे.
या तक्रारीवरून सावदा पोलिसांनी गुन्हा भारतीय न्याय संहिता (बीएनएस) कलम ११८(१), ११५(२), ३५२, ३५१(३) व ३(५) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
बैठकीतील किरकोळ वादाने काही मिनिटांतच हिंसक वळण घेतल्याचा दावा दोन्ही बाजूंनी केला आहे. दोन्ही गटांनी एकमेकांवर दांडक्याने व धारदार वस्तूने हल्ला केल्याचे आरोप केल्याने प्रकरण अधिकच गंभीर बनले असून याघटनेवेळी विश्राम गृहावर शिवसेनेचे जिल्हा पदाधिकारीही उपस्थित असल्याचे सांगितले जाते. आता प्रकरणी पोलीस पुढील कारवाई करत आहे.


