भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईममुक्ताईनगर

धक्कादायक : १३०० किलो भंगाराची गुपचूप विक्री ; सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह

मुक्ताईनगर, मंडे टु मंडे न्युज प्रतिनिधी | मुक्ताईनगर येथील सार्वजनिक बांधकाम विभागाने सुमारे १३०० किलो भंगार कोणतीही निविदा न काढता गुपचूप विकल्याचा आरोप होत आहे. यामुळे विभागाच्या पारदर्शकतेवर आणि कायदेशीर प्रक्रियेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

सरकारी नियमांनुसार, कोणतीही शासकीय वस्तू किंवा भंगार विक्रीसाठी वृत्तपत्रांमध्ये जाहिरात देणे बंधनकारक आहे. मात्र, याप्रकरणात कुठलीही निविदा न देता अधिकाऱ्यांनी परस्पर विक्री केल्याचा संशय नागरिक व्यक्त करत आहे.

पत्रकारांनी या संदर्भात विभागाकडे चौकशी केली असता, कोणताही जबाबदार संबंधित अधिकारी कार्यालयात नेहमी प्रमाणे हजर नव्हते . त्यानंतर तेथील असलेल्या कर्मचाऱ्यांना विचारणा केली असता, १३०० किलो भंगार असल्याची माहिती मिळाली. मात्र नेमकी भंगार किती किलो असावी याबाबत शंका कुशंका नागरिकांच्या मनात उपस्थित होत आहे नेमके वजन किती? आणि त्याची विक्री प्रक्रिया कशी पार पडली? आम्ही याची पावती फाडतो असे सांगून अधिक माहिती याबाबत विभागाने कोणतीही अधिकृतपणे दिलेली नाही.

या संपूर्ण प्रक्रियेमुळे भ्रष्टाचाराची शक्यता व्यक्त केली जात असून, कोणत्या तत्वावर आणि कोणत्या दराने भंगार विकण्यात आला, याची चौकशी करण्याची मागणी स्थानिक नागरिक आणि सामाजिक कार्यकर्ते करत आहेत.bसंबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या प्रकरणाची तातडीने चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी जोर धरत आहे.

सार्वजनिक बांधकाम विभाग येथील उपविभागीय अधिकारी बेंडकुळे साहेब यांना या संदर्भात माहिती घेण्यासाठी कॉल केला असता आपल्या ऑफिसची भंगार आपण निविदा न काढता विकली ती आपणास विकता येते का तर अधिकारी म्हणतात मला माहित नाही या संदर्भात माहिती घेऊन तुम्हाला सांगतो अशी उडवा उडवी ची उत्तरे देण्यात आली जबाबदार अधिकाऱ्याला न सांगता भंगार कर्मचारी कसे काय विकू शकता या संदर्भात नागरिकांच्या मनात प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!