रावेरशैक्षणिक

रावेर तालुक्यातील श्रेयाने पटकाविली भारतात पाचवी रॅंक

बलवाड़ी, ता. रावेर. मंडे टु मंडे न्युज प्रतिनिधी | रावेर तालुक्यातील बलवाडी येथील श्रेया राहूल पाटील हिने बॅचलर इन अप्लाइड आर्ट्स (बी एफ ए ) पुणे येथे पूर्ण करून नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ डिझाईन बंगलोर (एन आय डी ) रिटेल एक्सपिरेअन्स डिझाईन या पदवी परीक्षेत भाग घेऊन संपूर्ण भारतात पाचवी रँक मिळवलेली आहे.

सध्या ती ग्राफिक डिझाईनर म्हणून पुणे येथे कार्यरत असून ती प्रगतशील शेतकरी रमेश सिताराम पाटील यांची नात तर राहुल रमेश पाटील यांची कन्या आहे. तिने मिळविलेल्या यशाबद्दल परिसरात सर्वत्र अभिनंदन होत आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!