खिर्डी येथे महावितरण कंपनीचा अजब कारभार …चक्क दोरीने बांधला इलेक्ट्रिक पोल… हवेने किंवा धक्का लागताच नाचू लागतो पोल
खिर्डी, ता.रावेर.मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | रावेर तालुक्यातील खिर्डी खु! येथे महावितरण कंपनी ने भर वस्तीत विद्युत प्रवाह असलेल्या इलेक्ट्रिक पोल ला चक्क सुताच्या दोराच्या आधार दिला असून हवेचा किंवा धक्का लागताच पोल हलायला लागतो. पोल भर वस्तीत असल्याने खाली पडल्यास मोठी हानी होण्याचा संभव आहे.
सविस्तर वृत्त असे की गेल्या १५ दिवसापूर्वी अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावल्याने वाऱ्याने रावेर तालुक्यातील खिर्डी खु! येथील बाजार पट्टयातील लिंबाचे झाड पडून विद्युत इलेक्ट्रिक पोल वर पडून तार तुटले जाऊन पोल पूर्णपणे एका बाजूने वाकला गेल्याने त्याला काढून किंवा नवीन पोल न उभारता महावितरण कंपनीचे कर्मचारी व अधिकारी यांनी अजब शक्कल लढवली चक्क तुटलेल्या झाडाच्या खोडाला सुताचा दोर बांधून त्याला आधार देण्याचं काम केले.
विशेष म्हणजे ज्या ठिकाणी हा पोल उभा आहे तिथे आठवडे बाजार भरत असून बाजूला च वस्ती घरे आहेत लहान मुले, महिला बाहेर अंगणात बसलेले असतात. त्यातच सध्या हवामान विभागाने राज्यात व जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पाऊस व वारा येण्याचे संकेत दिल्याने विद्युत इलेक्ट्रिक पोल पडून मोठी जीवितहानी होऊ शकते. तरी महावितरण कंपनीने अशी दुर्घटना होऊ नये यासाठी त्वरित नवीन पोल उभारून दुरुस्त करण्यात यावा अशी मागणी परिसरातील रहिवाशी नागरिकांनी प्रतिनिधी शी बोलतांना केली.