ही अती दुर्मिळ घटना : भारतात पहिल्यांदाच ९ पोलिसांना दुहेरी फाशी,पोलिस दलात खळबळ
चेन्नई,मंडे टु मंडे न्युज नेटवर्क |२०२० मध्ये गाजलेल्या सथानकुलम पोलीस कोठडीतील हत्या प्रकरणात न्यायालयानं निकाल दिला आहे. मद्रास उच्च न्यायालयाच्या मदुराई खंडपीठानं या प्रकरणात तमिळनाडू पोलीस दलातील ९ जणांना दोषी धरलं आहे. त्यांना मृत्यूदंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. ही घटना अतिदुर्मीळ असल्याचं न्यायालयानं निकाल देताना म्हटलं आहे. पोलिसांनी केलेला गुन्हा अतिशय निर्घृण असल्याचं न्यायालयानं निकालात नमूद केलं आहे.
या प्रकरणी सहा वर्ष सुनावणी चालली. प्रथम अतिरिक्त जिल्हा आणि सत्र न्यायालयाचे न्यायमूर्ती जी. मुथुकुमारन यांनी या प्रकरणी निकाल दिला. त्यांनी सगळ्या नऊ आरोपींना हत्या आणि अन्य संबंधित कलमांच्या अंतर्गत दोषी धरलं. हे प्रकरण आत्यंतिक क्रूरता आणि सत्तेच्या दुरुपयोगाचं उदाहरण असल्याचं न्यायमूर्तींनी निकालात म्हटलं.
एका महिला कॉन्स्टेबलची साक्ष या प्रकरमात महत्वाचा पुरावा ठरली. पोलीस स्टेशनच्या टेबलावर आणि काठ्यांवर रक्ताचे डाग आढळले होते. नंतर दोघांनाही न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली, परंतु काही दिवसांतच जखमांमुळे त्यांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे देशभरात पोलीस क्रूरतेविरोधात तीव्र संताप उसळला. या प्रकरणाचा तपास सुरुवातीला राज्य सीआयडीने केला होता, परंतु मद्रास उच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर सीबीआयने तपास हाती घेतला. सीबीआयने एका इन्स्पेक्टर, दोन सब-इन्स्पेक्टर आणि अनेक कॉन्स्टेबल्ससह 10 पोलिसांना अटक केली होती.
तामिळनाडूत २०२० मधील लॉकडाऊन दरम्यान सातानुकुलम पोलीस कोठडीत जयराज (५८) आणि बेनिक्स (३८) या पिता-पुत्राला अमानुष मारहाण करून हत्या केल्याप्रकरणी मदुराई न्यायालयातील विशेष सीबीआय न्यायालयाने ९ पोलीस अधिकाऱ्यांना दुहेरी फाशीची शिक्षा सुनावली आहे. ही देशातील पहिलीच घटना आहे, जिथे इतक्या पोलिसांना एकत्र फाशीची शिक्षा झाली आहे .
जून २०२० मध्ये, तुतीकोरन जिल्ह्यात दुकान उघडे ठेवल्याच्या कारणावरून पिता-पुत्राला पोलीस ठाण्यात आणून रात्रभर बेदम मारहाण केली होती.
बाप-लेकाला पोलीस ठाण्यात रात्रभर मारहाण
ही घटना तुतीकोरिन जिल्ह्यातील सथानकुलमशी संबंधित आहे. इथे राहणारे व्यापारी पी. जयराज आणि त्यांचा मुलगा बेन्निक्स यांचा पोलिसांच्या ताब्यात असताना मृत्यू झाला. दोघांना १९ जून २०२० रोजी पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. त्यावेळी करोना संसर्गामुळे देशभरात लॉकडाऊन सुरु होता. ल़कडाऊनच्या नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी पोलिसांनी बाप लेकाला ताब्यात घेतलं होतं. मोबाईल ऍक्सेसरीजचं दुकान ठरलेल्या वेळानंतरही सुरुच ठेवल्याचा आरोप त्यांच्यावर होता.
पोलीस कोठडीत बाप, लेकांना बेदम मारहाण करण्यात आल्याचं तपासातून समोर आलं. संपूर्ण रात्र त्यांचा छळ करण्यात आला. त्यामुळे त्यांना गंभीर जखमा झाल्या. त्यामुळे अतिरक्तस्राव झाला. हेच त्या दोघांच्या मृत्यूचं कारण ठरलं. या घटनेनंतर देशभरात आक्रोश पाहायला मिळाला. पोलीस कोठडीत होणाऱ्या हिंसाचाराचा मुद्दा ऐरणीवर आला. न्यायाची मागणी जोर धरु लागली आहे. प्रकरणाचं गांभीर्य वाढल्यानं तपास सीबीआयकडे सोपवण्यात आला.
हायकोर्टाची परवानगी, अनोखा निकाल चर्चेत
सहा वर्षांनी न्याय झाला; ९ पोलिसांना फाशीची शिक्षा
बाप लेकांचा पोलीस कोठडीत झालेला छळ पूर्वनियोजित होता. हा छळ रात्रभर चालला, या बाबी सीबीआय तपासातून समोर आल्या. आरोपींनी जाणूनबुजून हा गुन्हा केला. त्यामुळे त्यांना कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी सीबीआयकडून करण्यात आली. ही मागणी न्यायालयानं मान्य केली. या प्रकरणात नऊ पोलिसांना दोषी ठरवण्यात आलं. त्यात निरीक्षक एस. श्रीधर, उपनिरीक्षक पी. रघु गणेश, के. बालकृष्णन यांचा समावेश आहे. त्यांच्या सोबतच मुख्य हवालदार एस. मुरुगन आणि ए. समदुरई, हवालदार एम. मुथुराज, एस. चेल्लादुराई, एक्स. थॉमस फ्रान्सिस, एस. वेलुमुथु यांचाही समावेश आहे.
