भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

जळगाव

पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांची ३७ पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कारवाई

जळगाव, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | महाराष्ट्र पोलीस कायदा व सुव्यवस्था राखणारी, गुन्हेगारी रोखणारी आणि नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी काम करणारी राज्यस्तरीय संस्था आहे. याच पार्श्वभूमीवर पोलिस खाते शिस्तीचे खाते म्हणून ओळखले जेते.
शिस्तीचे खाते म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पोलिस दलात वेळेचे भान राखले जावे, यासाठी जिल्हा पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी कडक पाऊल उचलत थेट उपस्थिती तपासणी केली. या तपासणीत उशिरा कामावर येणाऱ्या तब्बल ३७ अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कारवाई करत त्यांच्या अर्ध्या दिवसाच्या पगार कपातीच्या सूचना देण्यात आल्या आहेत. या कारवाई ने पोलिस खात्याला शिस्तीचा संदेश पोहचविण्यात आल्याचे आठवण देण्यासाठी करण्यात आल्याचे सांगण्यात आले.

पोलिस अधीक्षकपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर श्रीकांत धिवरे यांनी कार्यालयीन शिस्तीवर विशेष भर दिला आहे. अधिकारी व कर्मचारी वेळेत कार्यालयात उपस्थित राहतात की नाही, याची खात्री करण्यासाठी त्यांनी विविध शाखांमध्ये अचानक तपासणी मोहीम राबवली. यावेळी अनेक अधिकारी व कर्मचारी निर्धारित वेळेनंतर कार्यालयात येत असल्याचे निदर्शनास आले.

या तपासणीत ३७ पोलिस कर्मचारी उशिरा आल्याचे स्पष्ट झाल्यानंतर धिवरे यांनी शाखानिहाय यादी तयार करण्याचे आदेश दिले. तसेच संबंधितांवर अर्धवेतनी रजेच्या स्वरूपात अर्ध्या दिवसाचा पगार कपात करण्याच्या सूचना संबंधित विभागाला दिल्या. या कारवाईने पोलिस कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ उडाली.

विशेष म्हणजे, या कारवाईत केवळ कर्मचारीच नव्हे तर एका शाखेचे विधी अधिकारीही उशिरा आल्याचे आढळून आले. त्यांनाही करारानुसार वेळेचे पालन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

उशिरा येणाऱ्यांमध्ये पोलिस निरीक्षक, उपनिरीक्षक, सहायक फौजदार आणि इतर कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. यात सर्वाधिक संख्या जिल्हा विशेष शाखेतील कर्मचाऱ्यांची असल्याचे समोर आले आहे.

शाखानिहाय उशिरा आलेल्या कर्मचाऱ्यांची संख्या पुढीलप्रमाणे : जिल्हा विशेष शाखा – १४ उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालय, जळगाव – ७ बिनतारी संदेश शाखा – ५ अर्ज शाखा – ४ वाचक शाखा २ – २ नियंत्रण कक्ष – १ लेखा शाखा – १ सीडीआर – १ विभागीय चौकशी शाखा – १ सीसीटीएनएस – १ या कारवाईमुळे पोलिस दलात वेळेच्या शिस्तीबाबत स्पष्ट संदेश गेला असून, पुढील काळात उशिरा येणाऱ्यांवर अधिक कडक कारवाई होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!