भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

रावेर

तासखेडा अवैध उत्खनन : “ती” साक्ष खरी की खोटी? शासनाची दिशाभूल?

सावदा, ता. रावेर. मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | रावेर तालुक्यातील तासखेडा शिवारातील हतनूर धरण कालव्यातील पाटाच्या हजारो ब्रास मातीचे अवैध उत्खनन करण्यात आले. अधिकाऱ्यांना हाताशी धरून ह्या प्रकरणाची थातुर मातुर चौकशी करून प्रकरण दडपण्यात आले आहे.

अज्ञात व्यक्तीची पाठराखण
रावेर तालुक्यातील तासखेडा येथिल अवैध उत्खनन प्रकरणामंध्ये महसुल विभागा मार्फत करण्यात आलेल्या पंचनाम्यात साक्ष नोंदविण्यात आली असता यात अवैध उत्खनन करणाऱ्याची पाठ राखण केली गेली असल्याचे दिसून येते. पंचनाम्यांच्या साक्षीत “ज्या ठिकाणचा अवैध उत्खनाचा विषय केला जात आहे त्या ठिकाणी हे अवैध उत्खनन गेल्या सहा ते सात वर्षा आधीच केले गेले आहे तेव्हा पासुन ही जागा आशिच बघत आहोत. उत्खनन कोणी केले याची आम्हाला माहिती नाही” अशी साक्ष नोंदविण्यात आली. मात्र प्रत्यक्षात मागील दोन वर्ष आधीचा माती स्थित असल्याचा पुरावा “मंडे दू मंडे न्युज ” च्या हाती लागलेला आहे. त्या मुळे पंचनाम्यांवर शंका उपस्थित केली जात आहे. पाठराखण करून काही देवाण घेवाण किंवा काय?
तूर्त….!
(…..भाग – ६)…

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!