भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

महाराष्ट्रशैक्षणिक

ब्रेकिंग : शिक्षकांचे आझाद मैदानावर धरणे आंदोलन, शाळा दोन दिवस बंद, मात्र, शाळा बंद राहणार नाहीत – शिक्षण विभागाचे आदेश

मुंबई, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | राज्यातील पाच हजारांहून अधिक अंशत: अनुदानित खासगी शाळांना अनुदानाची टप्प्याटप्प्याने अंमलबजावणी करण्याचा निर्णय शासनाने गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये घेतला होता. मात्र १० महिने उलटूनही निधीची तरतूद न झाल्याने संतप्त शिक्षकांनी आज, ८ जुलै व बुधवार, ९ जुलै रोजी शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. हे दोन्ही दिवस शिक्षकांनी मोठ्या संख्येने आझाद मैदानात जमावे, असे आवाहन संघटनेने केले आहे. मात्र, त्यातच आता शिक्षण विभागाने पुन्हा नवीन आदेश काढले आहेत. ते म्हणजे, ८ आणि ९ जुलैला राज्यातील कुठल्याही शाळा बंद राहणार नाहीय.

राज्यात सुमारे पाच हजार ८४४ अंशत: अनुदानित शाळा कार्यरत आहेत. यामध्ये प्राथमिक विभागाच्या ८२०, माध्यमिक एक हजार ९८४ आणि उच्च माध्यमिक शाळांची संख्या तीन हजार ४० इतकी आहे. या शाळांमध्ये सुमारे आठ हजार ६०२ प्राथमिक शिक्षक, २४ हजार २८ माध्यमिक शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी आणि १६ हजार ९३ उच्च माध्यमिक कर्मचारी कार्यरत आहेत. सरकारने ऑक्टोबर २०२४मध्ये टप्पा अनुदान लागू करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार २० टक्क्यांपासून सुरुवात करून टप्प्याटप्प्याने शाळांना अनुदान देण्याची योजना जाहीर झाली होती. मात्र यासंबंधी प्रत्यक्ष निधी वितरित झालेला नाही.

एकीकडे शिक्षक संघटनांनी ८ व  ९ तारखेला राज्यातील शाळा बंद ठेवण्याची घोषणा केली आहे तर दुसरीकडे शिक्षण विभागाने राज्यातील कुठल्याही  शाळा बंद राहणार नसल्याचे आदेश काढले आहेत.

शिक्षण विभागानं असे आवाहन केले आहे की, ८ व ९ जुलैला सुट्टी कुठल्या सणामुळे किंवा नियोजित नव्हती, तर हजारो शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी आपल्या हक्कांसाठी पुकारलेल्या राज्यव्यापी आंदोलनामुळे होती. त्यामुळे पालकांनी याची नोंद घेऊन आपलं नियोजन करावं, असं आवाहन देखील करण्यात आलं होतं. मात्र, शिक्षण विभागाने विद्यार्थ्यांचं हित पाहता राज्यातील शाळा बंद राहणार नसल्याचा निर्णय घेतला आहे. माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण विभागाचे संचालक महेश पालकर यांनी हे आदेश काढले आहेत.”

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!