भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

नगरपालिकाप्रशासनमहाराष्ट्रराजकीय

मोठी बातमी : राज्यातील नगरपालिकांसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका केव्हा? राज्य निवडणूक आयोगाने बोलवली बैठक

मुंबई, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या राज्यातील नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती, महानगरपालिका अशा सवर्च स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कधी होणार या कडे सर्वांचे लक्ष लागलेले असताना एक महत्वाची माहिती समोर आली आहे. राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना पत्राद्वारे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या अनुषंगाने दिनांक १० जुलै रोजी
व्हीसीद्वारे बैठक बोलावली आहे.

१० जुलै रोजी दुपारी १२ वाजता व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे
मुंबई शहर व मुंबई उपनगर जिल्हा वगळून राज्यातील इतर सर्व जिल्ह्यातील निवडणूक पूर्व परिस्थितीचा आढावा या बैठकीत घेतला जाणार आहे.

राज्य निवडणूक आयोगाच्यावतीने उपायुक्त राजेंद्र पाटील यांनी याबाबतचे पत्र राज्यातील सर्व विभागीय आयुक्तांना पाठविले असून उपरोक्त १० तारखेला व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे होणाऱ्या बैठकीस आपण उपस्थित राहण्याचे सांगण्यात आले आहे.

राज्यातील ३२ जिल्हा परिषदा आणि ३३६ पंचायत समित्या, २४८ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायती आणि २९ महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुका आगामी काळात घेण्यात येणार आहेत. या निवडणुकीच्या (महानगरपालिका वगळून) पूर्व तयारीचा विभागनिहाय आढावा मा. राज्य निवडणूक आयुक्त व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे या बैठकीत घेणार आहेत.असे परिपत्रकच राज्य निवडणूक आयोगाने काढले आहे.

या बैठकीमध्ये या विषयांचा आढावा घेण्यात येणार आहे
१) निवडणुका घेण्यात येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था
२) मतदार संख्या
३) मतदान केंद्र
४) ईलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रे (एतच्)
५) आवश्यक मनुष्यबळ
६) वेळेवर उपस्थित होणारे मुद्दे

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!