एसटी बस आणि टेम्पोचा भीषण अपघात : एक ठार, ७ ते ८ गंभीर, जळगाव जिल्ह्यातील घटना
जळगाव, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | पहाटेच्या सुमारास एसटी बस आणि खासगी टेम्पोची जोरदार धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात एकाचा मृत्यू झाला तर पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना भडगाव- पारोळा मार्गावर वाघरे गावाजवळ घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, सोयगावहून धुळ्याकडे जाणारी एसी बस क्र. एम एच -१४ बी टी – १९८४ ला वाघरे गावाजवळ समोरून येणाऱ्या खासगी टेम्पो क्र. एम एच -१९ सी वाय – १६०६ या वाहनाशी जोरदार धडकली. या भीषण अपघातात पंकज पाटील (३०, उंदीरखेडा) यांचा मृत्यू झाला
तर अपघातातील जखमींनाअसून या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. तातडीने पारोळा येथील सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून काहिंची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना अन्य खासगी रुग्णालयात हलविण्यात आले आहे.
जखमींची नावे
या अपघातात मिराबाई पंढरी सोनवणे (५५, सोयगाव), निलाबाई घनश्याम सिरसागर (७५, धुळे), अंजनाबाई रघुनाथ पाटील (७०, हनुमंत खेडा), मनोहर सजन पाटील (६०, चोरवड), रमेश धोंडू चौधरी (८०, भडगाव), मीराबाई रघुनाथ पाटील (८०, धुळे) आणि जानवी संतोष मोरे (१९, धुळे) जखमी झाले असून या जखमींवर पारोळा आणि भोले विघ्नहर्ता रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
